HBD Kartik Aaryan : कार्तिकला साधं किस करता आलं नाही, ३७ वेळा दिले रिटेक! | पुढारी

HBD Kartik Aaryan : कार्तिकला साधं किस करता आलं नाही, ३७ वेळा दिले रिटेक!

पुढारी ऑनलाईन :

‘प्यार का पंचनामा’ मध्ये दमदार अभिनय करून हिट झालेल्या कार्त‍िक आर्यन (HBD Kartik Aaryan) याचा आज वाढदिवस आहे. त्याने बॉलीवूडमध्ये कॉमेडी ते रोमँटिक चित्रपटापर्यंत आपली चॉकलेटी हीरोची प्रतिमा कायम ठेवलीय. (HBD Kartik Aaryan) परंतु, चित्रपटात कुठलेही नखरे न करता बेधडक रोमँटिक सीन्स देणाऱ्या कार्त‍िक आर्यनला मात्र किसिंग सीन करताना तारेवरची कसरत करावी लागली होती.

आर्यनने कॉलेजमध्ये असताना शेवटच्या वर्षी चित्रपट साईन केला होता. त्याला प्यार का पंचनामाचा ऑफर मिळाली.या चित्रपटानंतर त्याने ‘आकाशवाणी’ आणि मग, ‘कांची: द अनब्रेकेबल’ मध्ये काम केलं. कांचीमध्ये सपोर्ट‍िंग भूमिका मिळाली होती. सुभाष घई या चित्रपटाचे दिग्दर्शक होते. म्हणून त्याने या चित्रपटासाठी होकार दिला होता.

या चित्रपटात त्याला अभिनेत्री मिष्टीसोबत एक किसिंग सीन द्यायचं होतं. पण, हे आर्यनसाठी इतकं सोपं नव्हतं. त्याला किस करायला येत नव्हतं. आणि त्यासाठी तब्बल ३७ वेळी रि-टेक्स द्यावे लागले होते.

एका मुलाखतीत त्याने याविषयी सांगितलं होतं की,सुभाषला पॅशनेट किस हवं होतं. पण, मला किस करायला येत नव्हत. मी तर त्यांना विचारणार होतो की, सर प्लीज हे करून दाखवा कसं करायचं आहे.’

‘मी कधी विचारदेखील केला नव्हता की, किसिंग सीन इतकी मोठी डोकेदुखी ठरेल. आम्ही त्यादिवशी लव्हर्सप्रमाणे वागलो. अखेर सुभाष यांना जो सीन हवा होता तो मिळाला.

 

View this post on Instagram

 

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)

 

View this post on Instagram

 

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)

 

View this post on Instagram

 

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)

 

View this post on Instagram

 

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)

 

View this post on Instagram

 

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)

 

View this post on Instagram

 

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)

Back to top button