The Innovator’s Dilemma : नवनिर्मिती उगलडणाऱ्या संशोधनाची पंचविशी | पुढारी

The Innovator's Dilemma : नवनिर्मिती उगलडणाऱ्या संशोधनाची पंचविशी

The Innovator's Dilemma : नवनिर्मिती उगलडणाऱ्या संशोधनाची पंचविशी

मोहसीन मुल्ला

कोडॅक ही कंपनी एकेकाळी कॅमेरा आणि पेपर फिल्ममध्ये जगावर अधिराज्य गाजवत होती; पण जेव्हा डिजिटल कॅमेऱ्यासोबत स्पर्धा करण्याची वेळ आली तेव्हा मात्र कोडॅक पूर्णपणे अपयशी ठरली. मायक्रोसॉफ्टसारख्या जगप्रसिद्ध कंपनीला सर्च इंजिनमध्ये ठसा उमटवता आला नाही. तर गुगलसारख्या सर्च इंजिनला सोशल मीडियात पूर्ण माघार घ्यावी लागली. प्रस्थापित कंपन्या अशा प्रकारच्या नाविन्यपूर्ण उत्पादनांना तोंड देताना अपयशी का ठरतात? ,हा प्रश्न हार्वर्ड युनिव्हर्सिटीतील प्रा. क्लिटन क्रिस्टिन्सन यांनाही पडला होता. १९९७ला त्यांनी या प्रश्नाचं उत्तर देणारे पुस्तक लिहिलं The Innovator’s Dilemma: When New Technologies Cause Great Firms to Fail.  

आता डिजिटलमध्ये Disruptive Technologies हा शब्द जो सातत्याने वापरला जातो. त्याचे जनक म्हणजे प्रा. क्रिस्टिन्सन होय. Disruptive Technologies ही संज्ञा त्यांनी सर्वप्रथम १९९५ला वापरली होती. यंदाचे  वर्ष या पुस्तकाचे २५वं वर्ष आहे. तंत्रज्ञान व्यवस्थापनाकडे पाहण्याची नवी दृष्टी देणारे हे पुस्तक अल्पावधीत जगप्रसिद्ध झाले. प्रा. क्रिस्टिन्सन यांनी इतर बरेच शोधनिबंध आणि ग्रंथ लिहिलेले आहेत. Disruptive Innovation वर अधिकारवाणीने बोलू शकणारे तज्ज्ञ क्रिस्टिन्सन यांचा बोलबाला नंतरच्या काळात झाला. 

Innosight नावाची त्यांची एक संस्थाही या क्षेत्रातच कार्यरत आहे. Disruptive Technologiesला त्यांनी नंतर Disruptive Innovation अशी संज्ञा दिली. आता तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीच्या तोंडी ही संज्ञा सहज येऊन जाते. प्रा. क्रिस्टिन्सन यांनी फक्त ही संकल्पना मांडली असं नाही तर अशा प्रकारच्या Disruptive Innovationना प्रस्थापित कंपन्या कशा प्रकारे तोंड देऊ शकतात, याची मांडणीही त्यांनी पुढील संशोधनातून केलेली आहे.  

The Innovator’s Dilemma: When New Technologies Cause Great Firms to Fail, या पुस्तकाचा जगावर फार मोठा प्रभाव आहे. इकॉनॉमिस्ट या मासिकाने या पुस्तकाची गणना जगभरातील आतापर्यंतच्या ६ सर्वोत्तम व्यवसायिक पुस्तकात (बिझनेस बुक्स) मध्ये केलेली आहे.  तर ग्लोबल बिझनेस बुक ॲवार्डही या पुस्तकाला मिळाले आहे.

Disruptive Innovationला काही वेळा Creative Destruction या नावानेही ओळखले जाते. आणि ही प्रक्रिया आर्थिक पातळीवर घडते. 

Disruptive Innovation नेमकं कसं घडतं?

सगळ्याच नवनिर्मिती हा Disruptive प्रकारात येत नाहीत. काही नवनिर्मिती स्वतःसाठी अगदी नवीनच बाजारपेठ तयार करतात. पण काही नवनिर्मिती मात्र Disruptive प्रकारचे असतात. ही प्रक्रिया अर्थव्यवस्थेच्या तळाशी सुरू होते. ज्या ग्राहकांना प्रस्थापित कंपन्या सेवा, उत्पादन पुरवू शकत नाहीत, अशा ग्राहकांना Disruptive Innovation सेवा देतात. सुरुवातीला ही उत्पादनं किंवा सेवा कमी दर्जाची आहेत, असं मानलं जातं; पण त्यांच्या मेनस्ट्रीममधल्या उत्पादन आणि सेवांना पर्याय म्हणून उभे राहण्याची पूर्ण क्षमता असते. 

बाजारपेठेत असे काही घडत असताना प्रस्थापित कंपन्यांचा स्वाभाविक कल हा आताचे सर्वांत फायदेशीर सेगमेंटमधील ग्राहकांकडे लक्ष देण्याकडे असतो. ही प्रक्रिया अगदीच स्वाभाविकरीत्या घडत जाते. त्यातून Disruptive Innovation कडे अशा प्रस्थापित कंंपन्यांचं पूर्ण दुर्लक्ष होते आणि बघता बघता Disruptive Innovation मेनस्ट्रीमधील उत्पादन आणि सेवांना पर्याय म्हणून प्रस्थापित होतात. 

प्रा. क्रिस्टिन्सन यांनी विविध कंपन्याचा हवाला देत, याची सविस्तर मांडणी या पुस्तकात केलेली आहे. प्रो. क्रिस्टिन्सन यांचं २३ जानेवारी २०२०ला निधन झाले. त्यांच्या संशोधनातून केलेली मांडणी जगभरातील कंपन्यांसाठी कायमस्वरूपी दिशादर्शक ठरत आहे.

हेही वाचलं का? 

Back to top button