श्वेता तुझे नक्की वय किती? | पुढारी

श्वेता तुझे नक्की वय किती?

छोट्या पडद्यावर आपल्या दमदार अभिनय आणि फिटनेससाठी प्रसिद्ध असलेली 42 वर्षीय अभिनेत्री श्वेता तिवारी सोशल मीडियावर ग्लॅमरस फोटो शेअर करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का देत असते. आता श्वेताने लेटेस्ट ग्लॅमरस फोटोशूट शेअर केला आहे. तिच्या या फोटोशूटचे चाहते तोंडभरून कौतुक करताना दिसत आहेत. श्वेताने हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. भिजलेल्या केसांत श्वेता फोटोंत दिसत आहे. बॅज कलरच्या बाँडी हँगिग ड्रेसमध्ये तरुण अभिनेत्रींनाही टक्कर देत आहे.

श्वेताची मुलगी पलकनेही बॉलीवूडमध्ये पदार्पण केले असताना श्वेताचे ग्लॅमरस फोटो पाहून चाहते बुचकळ्यात पडले आहेत. आईला की मुलीला हिरोईन म्हणून घ्यावे, असे दिग्दर्शकांना नक्कीच वाटेल असे श्वेताचे फोटोशूट आहे. तिच्या फोटोंना एक तासांत सुमारे सव्वा लाख लाईक्स आले आहेत. श्वेताचे वय कमीच होत चालले असून ती 32 आणि 22 वर्षांची वाटत असल्याची एकाने तर ‘कसौटी जिंदगी की’ची ती प्रेरणा असून तशीच दिसत आहे, अशी दुसर्‍या एकाने तर खरेच तुझ्या वयाचा अंदाज लावणे कठीण असल्याचे तिसर्‍या एकाने प्रतिक्रिया दिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shweta Tiwari (@shweta.tiwari)

Back to top button