रावणाच्या भूमिकेबाबत लवकरच सांंगू | पुढारी

रावणाच्या भूमिकेबाबत लवकरच सांंगू

दाक्षिणात्य अभिनेता यशला ‘केजीएफ’मुळे मोठी ओळख मिळाली. त्यातील त्याचे रॉकी भाई हे पात्र खूपच गाजले. अशातच निर्माता नितेश तिवारी याच्या ‘रामायण’ या चित्रपटाची चर्चा सुरू आहे. या चित्रपटासाठी रणबीर आणि आवियाच्या नावावरूनही गोंधळ सुरू आहे.‘रामायण’ चित्रपटात रावणची भूमिका यश साकारणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. याबाबत आता स्वत: यशने स्पष्टीकरण देत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. यश हा पत्नी राधिका मुलांसह त्याच्या गावी म्हैसूरला गेला होता. यावेळी त्यानं कुटुंबासह नंजुंडेवर मंदिराला भेट दिली. माध्यमांशी बोलताना तो म्हणाला की, चाहते त्यांच्या मेहनतीच्या पैशातून चित्रपट पाहतात. मला त्यांच्या पैशांची कदर आहे. आम्ही प्रामाणिकपणे आणि समर्पणाने काम करत आहोत. कारण चित्रपट हे संपूर्ण देशच नाही तर जगही पाहत आहे. त्यामुळे मला या जबाबदारीची जाणीव आहे. आम्ही खूप मेहनत घेत आहोत आणि आम्ही जे मिळून काम करत आहोत त्यावर प्रत्येकजण खूश होईल. ‘रामायण’मधील रावणाच्या पात्राच्या ऑफरबाबतही तो म्हणाला की, तो भूमिका मिळवण्यासाठी कोणाकडे गेला नसून त्याच्या कामामुळे प्रत्येकाला त्याच्याकडे रावणाची भूमिका आली असून लवकरच याबाबत मोठी घोषणा करणार आहे.

Back to top button