The Archies : सुहाना, खुशी आणि अगस्त्य नंदाच्या प्रेम- ब्रेकअपची कथा; ‘द आर्चीज’ टीझर रिलीज | पुढारी

The Archies : सुहाना, खुशी आणि अगस्त्य नंदाच्या प्रेम- ब्रेकअपची कथा; 'द आर्चीज' टीझर रिलीज

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानची मुलगी सुहाना खान आगामी ‘द आर्चीज’ ( The Archies )  या चित्रटामुळे चर्चेत आली आहे. नुकताच सुहानाच्या या चित्रपटाचा धमाकेदार टीझर रिलीज झाला आहे. चित्रपटात एकिकडे प्रेम आणि त्यानंतर झालेले ब्रेकअप दाखविणारी कथा मांडली आहे.

शाहरुखची मुलगी सुहाना ‘द आर्चीज’ चित्रपटातून पहिल्यांदा बॉलिवूडमध्ये पदार्पण करत असल्याने चाहत्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन झोया अख्तर यांनी केले आहे. सुहानासोबतच श्रीदेवीची मुलगी खुशी कपूर आणि अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदाही या चित्रपटातून पहिल्यांदा डेब्यू करत आहेत. नेटफ्लिक्सच्या ब्राझीलमधील वार्षिक टुडम कार्यक्रमादरम्यान ‘द आर्चीज’ चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला.

‘द आर्चीज’ ( The Archies ) चित्रपटाचा टिझर १ मिनिट २६ सेकंदाचा असून नेटफ्लिक्स आणि सुहाना खानच्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवर रिलीज करण्यात आला आहे. यात पहिल्यांदा रिवरडेल हिल्स स्टेशनवर थांबलेल्या ट्रेनने सुरूवात होते. यानंतर शहरात रेट्रो कार, अँग्लो इंडियन व्हाइब्स दिसतात. या चित्रपटात सुहानाच्या भूमिकेचे नाव वेरोनिका आणि खुशीच्या भूमिकेचे नाव बेट्टी असे आहे. दरम्यान दोघीजणी एका पार्टीत धमाकेदार डान्स करतानाही दिसत आहेत. याशिवाय कथेमध्ये काहीसे प्रेम आणि त्यानंतर झालेले ब्रेकअप दाखवण्यात आलं आहे.

सुहानाच्या इंन्स्टाग्रामर चित्रपटाचा व्हिडिओ शेअर करताना त्याच्या कॅप्शनमध्ये ‘Are you ready to go back in time?, Welcome to The Archies ♥️’ असे लिहिले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच बॉलिवूड स्टार्ससोबत चाहत्यांनी भरभरून कौतुक केलं आहे. अभिनेता करण जोहरने ‘मी खूप उत्साहित आहे.’ नव्या नंदाने ‘व्वा.’ असे म्हटलं आहे. तर सोशल मीडियावरील युजर्सनी कॉमेन्टससोबत हार्ट आणि फायरचे ईमोजी शेअर केलेत.

‘द आर्चिस’ चित्रपटात सगळ्या नव्या स्टार्सना संधी मिळाली आहे. यात सुहाना आणि खुशीसोबत वेदांग रैना, मिहिर आहूजा, युवराज मेंडा यांच्या भूमिका आहेत. परंतु, निर्मात्यांनी अद्याप चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणा केलेली नाही.

हेही वाचा : 

 

Back to top button