Heart Of Stone Trailer : आलिया भट्टचा पहिला हॉलिवूड चित्रपट ‘हार्ट ऑफ स्टोन’चा ट्रेलर रिलीज

Heart Of Stone Trailer : आलिया भट्टचा पहिला हॉलिवूड चित्रपट ‘हार्ट ऑफ स्टोन’चा ट्रेलर रिलीज

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टचा बहुप्रतीक्षित हॉलिवूड चित्रपट 'हार्ट ऑफ स्टोन' (Heart Of Stone Trailer) चा ट्रेलर रिलीज झाला आहे. आलियाचा हा पहिला हॉलिवूड चित्रपट आहे, तसेच ती पहिल्यांदाच हॉलिवूड चित्रपटात खलनायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात गॅल गॅडोट आणि जेनी डोर्नन मुख्य भूमिकेत दिसत आहेत.

आलिया भट्ट आतापर्यंत बॉलिवूडमध्ये नायिकेच्या भूमिकेत दिसत होती. पण तिने हॉलिवूडमध्ये खलनायीका म्हणून एन्ट्री घेतली आहे. आलिया तिच्या पहिल्याच हॉलिवूड चित्रपटात अॅक्शनसोबतच विलेनगिरी करताना दिसणार आहे. हार्ट ऑफ स्टोनच्या ट्रेलरमध्ये ती हातात बंदूक धरलेली दिसत आहे. या चित्रपटात गॅल गॅडोट एका गुप्त एजंटची भूमिका साकारत आहे. ट्रेलरमध्ये बोलले जाणारे डायलॉग देखील खूप दमदार दिसत आहेत. आलियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून 'हार्ट ऑफ स्टोन' (Heart Of Stone Trailer) चा ट्रेलर शेअर केला आहे. ज्यामध्ये ती फक्त काही सीन्समध्ये दिसत आहे. मात्र, खलनायिकेची भूमिका साकारणाऱ्या आलियाने यातही बाजी मारली आहे.

गरोदरपणात केले होते चित्रपटाचे शूटींग (Heart Of Stone Trailer)

हार्ट ऑफ स्टोन चित्रपटाची चाहते खूप दिवसांपासून वाट पाहत होते. आलियाने गरोदरपणातही या चित्रपटाचे शूट केले होते. तसेच हा तिचा पहिला हॉलिवूड चित्रपट आहे. त्यामुळे हा चित्रपट तिच्यासाठी खूप खास आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ती ब्राझीलला गेली होती. तिने फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत हार्ट ऑफ स्टोनच्या टीम आणि तिच्या सहकलाकारांचे कौतुक केले होते. हॉलिवूडमध्ये काम करणे खूप स्पेशल असल्याचे तिने सांगितले होते. तिचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा बॉलीवूड चित्रपटही याच वर्षी प्रदर्शित होणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt ? (@aliaabhatt)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news