साेनाक्षी सिन्हा म्‍हणते, मला वजनावरून मित्र.. | पुढारी

साेनाक्षी सिन्हा म्‍हणते, मला वजनावरून मित्र..

सोनाक्षी सिन्हा ही बॉलीवूडमधील एक आघाडीची अभिनेत्री आहे. 2010 मध्ये तिने ‘दबंग’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले आहे; पण बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्याचा तिचा प्रवास सोपा नव्हता. बॉलीवूडमध्ये पाऊल टाकण्याच्या आधी तिने तिचे सुमारे 30 किलो वजन कमी केले. 2010 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दबंग’ चित्रपटात सोनाक्षीने प्रमुख भूमिका साकारली होती. या चित्रपटात तिच्या जोडीला सलमान खान प्रमुख भूमिकेत होता.

सोनाक्षीने अगदी मोकळेपणाने आतापर्यंत वजन कमी करण्याच्या तिच्या या प्रवासाबद्दल भाष्य केले आहे. बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्याच्या आधी तिचे वजन 95 किलो होते; पण सिनेसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी तिने तिचे 30 किलो वजन कमी केले. सोनाक्षीने आतापर्यंत अनेकदा सांगितले आहे की, ती लहान असताना तिला तिच्या वजनावरून मित्र-मैत्रिणी चिडवत. सोनाक्षी लहानपणीपासूनच जास्त वजन असणार्‍या मुलांपैकी एक होती. वयाच्या 18 व्या वर्षी तिचे वजन 95 किलो होते. ती तिच्या वजनाबद्दल नाखूश होती आणि तिने स्वतःमध्ये बदल करायचे ठरवले.

Back to top button