BBMARATHI : आजी घेणार घराचा निरोप, सदस्यांना अश्रू अनावर - पुढारी

BBMARATHI : आजी घेणार घराचा निरोप, सदस्यांना अश्रू अनावर

मुंबई;पुढारी ऑनलाईन :

एका आठवड्या आधी आपल्या सगळ्यांच्या लाडक्या, जवळच्या व्यक्तीचे आगमन बिग बॉस मराठीच्या (BBMARATHI) घरामध्ये झाले आणि ती व्यक्ति म्हणजे आजी. इतक्या कमी वेळामध्ये देखील सगळेच सदस्य आजीशी मनाने जोडले गेले. सदस्यांनी आजीसोबत बराच वेळ घालवला. तिच्यासमोर थोडी भांडण झाली. आजीचा खाऊ सगळ्यांनी मिळून खाल्ला. तिच्याशी गप्पा मारल्या. पण आज वेळ आली आहे घरामधून आजीचा निरोप घेण्याची. (BBMARATHI) आजीचा आवाज पुन्हाएकदा आणि शेवटचा घरामध्ये घुमला.

आजी म्हणाली, “मला इथे येऊन एक आठवडा झाला सुध्दा. चला म्हणजे आता निरोप घ्यायची वेळ आली आहे. माझी इच्छा आहे की, तुम्ही तुमच्या आजीला जे काही सांगायचे राहून गेलं असेल ते मला सांगाना…”

आजीच्या या घोषणेनंतर प्रत्येक सदस्याला अश्रू अनावर झाले. सगळेच सदस्य अत्यंत भावुक झाले. मीराने आपल्या भावना, खंत, तक्रार आजीसमोर मांडली.

मीरा म्हणाली, “आजी माझी तक्रार आहे तुमच्याकडे खूप लवकर गेलात तुम्ही. जेव्हा पूर्ण जगाशी मी एकटी लढत होते, कोणीही नव्हतं माझ्याबरोबर तेव्हा मला वाटायचं. माझी आई देखील म्हणायची जर आजी असती तर तुझ्याबरोबर असती. मी जिथे राहिली असती तिथे ती राहिली असती.

अगदी १६ – १७ वयाची मी असताना तू गेलीस आणि त्याच्यानंतर सगळ्या जगासोबत मी एकटी लढली आहे तुझ्याशिवाय. पण इथे बिग बॉसच्या आजीला बघितल्यावर मला एक वेगळं असं कनेक्शन वाटलं होतं… म्हणजे समोर आहे बसं एकवढचं हवं आहे, बाकी काही नसेल तरी चालेल. बसं दिसतं राहा कधी कधी… !

बघूया अजून कोणत्या सदस्यांनी आपल्या मनातल्या भावना आजीसमोर आज व्यक्त केल्या ते आजच्या भागामध्ये. तेव्हा बघत राहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

Back to top button