जळगाव : एका तरूणाकडून ६ व ७ वर्षांच्या दोन बहिणींवर अत्‍याचार

जळगाव : एका तरूणाकडून ६ व ७ वर्षांच्या दोन बहिणींवर अत्‍याचार
Published on
Updated on

जळगाव तालुक्‍यात (६ वर्ष) आणि (७ वर्ष) वयाच्या दोन बहिणींवर एका तरूणाने लैंगिक अत्‍याचार केल्‍याची संतापजनक घटना घडली आहे. नशीराबाद पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर संशयित तरुणाला अटक करण्यात आली.

तालुक्यात दोन्ही चिमुकल्या मुली कुटुंबियांसह वास्तव्यास आहेत. बुधवारी सायंकाळी त्याच गावात राहणारा तरुण मुलींच्या घरी गेला होता. त्याने दोघा चिमुकल्या बहिणींवर लैगिक अत्याचार केला. घटनेची माहिती समोर आल्यानंतर पिडीत मुलींच्या कुटुंबियांनी नशीराबाद पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. तक्रारीवरुन अत्याचारासह पोक्सो कलमान्वये तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित तरुणास पोलिसांनी अटक केली. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अनिल मोरे करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news