राशिभविष्य (दि.२२ ऑक्टोबर २०२१) | पुढारी

राशिभविष्य (दि.२२ ऑक्टोबर २०२१)

राशिभविष्य

राशिभविष्य
मेष
मेष- आशा-आकांक्षा पूर्ण होतील. आवडत्या व्यक्‍तींचा सहवास लाभेल. गुंतवणुकीसाठी उत्तम दिवस. मनोरंजनात दिवस जाईल.

राशिभविष्य

वृषभ

– परावलंबी स्वभावामुळे कामांत अडचणी येतील. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता. आश्‍वासन, शब्द देऊ नका. आळस सोडा.
राशिभविष्य
मिथुन
मिथुन- नवीन गोष्टी अंगीकाराल. कामांना गती मिळेल. विवाह विषयक सुवार्ता ऐकायला मिळेल. आर्थिक नियोजनामुळे बचत होईल. लाभदायक दिवस.
राशिभविष्य
कर्क
कर्क- कौटुंबिक समस्या संवादाने सुटतील. मनासारख्या घटना घडतील. वरिष्ठांची मर्जी राखाल. प्रलंबित कामे पूर्ण होतील. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल.
राशिभविष्य
सिंह
सिंह- भावनाप्रधान क्षण येतील. व्यवहारात सावधानता बाळगा. खोट्या आमिषांना बळी पडू नका. प्रशासकीय कामांत अडचणी येतील.
राशिभविष्य
कन्या
कन्या- दुसर्‍यांचे म्हणणे ऐकून घ्या. निर्णय घेताना घाई नको. जुने आजार उद्भवतील. जवळच्या लोकांकडून अपेक्षाभंगाची शक्यता. आत्मचिंतन करा.
राशिभविष्य
तुळ
तूळ- जोडीदाराबरोबर पर्यटनाचा आनंद घ्याल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. समज-गैरसमज दूर होतील. प्रश्‍न मार्गी लागतील.

राशिभविष्य

वृश्‍चिक- मान-सन्मान होतील. सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यात सहभाग घ्याल. शत्रूंवर विजय प्राप्त कराल. आर्थिक प्रगती होईल.
राशिभविष्य
धनु
धनु- अतिसाहस मनःस्ताप देणारे ठरू शकते. गुंतवणूक करू नका. नुकसान होण्याची शक्यता. संयम ठेवणे गरजेचे आहे.
राशिभविष्य
मकर
मकर- त्याच, त्याच गोष्टी उगाळत बसल्याने मनःस्वास्थ्य बिघडेल. कौटुंबिक समस्या निर्माण होतील. अनावश्यक खर्च टाळा. मनाविरुद्ध घटना घडतील.
राशिभविष्य
कुंभ
कुंभ- प्रामाणिकपणा व सचोटीने केलेल्या प्रयत्नांना यश मिळेल. देणी द्या. भावंडांकडून सहकार्य लाभेल. आर्थिक नियोजन कराल. उत्साहवर्धक वातावरण राहील.
राशिभविष्य
मीन
मीन- क्रोधावर नियंत्रण आवश्यक आहे. गुंतवणुकीसाठी अयोग्य दिवस. कौटुंबिक अस्वास्थ्य राहील. अनावश्यक खर्च होईल.

Back to top button