डॉमनिकामध्ये आढळला विशालकाय अजगर | पुढारी

डॉमनिकामध्ये आढळला विशालकाय अजगर

रोसेऊ : चिमुकला कॅरेबियन देश डॉमनिकामध्ये विशालकाय अजगर आढळून आला आहे. हा साप इतका मोठा आहे की एका क्रेनच्या सहाय्याने त्याला उचलण्यात आले. अनेकांनी त्याची लांबी विश्वविक्रमी असल्याचे म्हटले आहे. मात्र, तो नेमका किती फूट लांब आहे हे समजू शकले नाही. काहींच्या मते, तो दहा फूट लांबीचा आहे.

डॉमनिकामध्ये वर्षावनात सफाईवेळी कर्मचार्‍यांना हा अजगर आढळला. त्यांनी एका क्रेनच्या सहाय्याने त्याला उचलून धरले. या लांबलचक आणि जाडजूड अजगराला पाहून अनेकांची बोबडी वळली. हा जिवंत अजगर क्रेनने उचलल्यावर तो वरच्या दिशेने तोंड करून हालचाल करू लागला. त्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. डॉमनिका हा अतिशय लहान आकाराचा देश आहे. या देशात घनदाट जंगले असून मोठी जैवविविधता आहे. तिथे बोआ प्रजातीचे अजगर आढळतात. हे अजगर तेरा फूट लांबीचेही असतात.

Back to top button