वर्ल्ड हिप हॉप स्पर्धा : लायन्स ग्रुपला कास्य पदक

वर्ल्ड हिप हॉप स्पर्धा : लायन्स ग्रुपला कास्य पदक
Published on
Updated on

मुंबई; पुढारी ऑनलाईन :

लायन्स ग्रुप, मायनस थ्री ग्रुप या दोन्ही ग्रुपनी वर्ल्ड हिप हॉप स्पर्धेमध्ये आपली चमक दाखवली आहे. 'मी होणार सुपरस्टार' हे दोन्ही ग्रुप या कार्यक्रमामधील आहेत. अत्यंत मानाच्या समजल्या जाणाऱ्या जागतिक दर्जाच्या वर्ल्ड हिप हॉप स्पर्धेमध्ये लायन्स ग्रुपने कांस्यपदक पटकावलं आहे. तर मायनस थ्री ग्रुपही दहावं स्थान गाठण्यात यशस्वी झाला आहे. तमाम भारतीयांसाठी आणि हिप हॉप प्रेमींसाठी हा अभिमानाचा क्षण आहे.

'मी होणार सुपरस्टार' या कार्यक्रमाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. सुपरजज अंकुश चौधरी, कॅप्टन्स कृती महेश आणि वैभव घुगे आणि संस्कृती बालगुडेचं दिमाखदार सूत्रसंचालन या कार्यक्रमात आहे.

प्रत्येक प्रतिभावान कलाकाराला त्याच्या कलेसाठी हवं असतं एक हक्काचं व्यासपीठ. ज्याद्वारे तो त्याची कला लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. असेच कलेचे व्यासपीठ म्‍हणजे मी होणार सुपरस्टार जल्लोष डान्सचा. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या ६० स्पर्धकांनी स्वतःला सिद्ध केलं. त्यातील ४ सर्वोत्तम स्पर्धकांनी आता महाअंतिम फेरी गाठली आहे. या कार्यक्रमाचा विजेता सुपरस्टार कोण ठरेल?

द लायन्स ग्रुप आणि एक म्हणजे मायनस ३ ग्रुप गेली काही वर्षे परफॉर्म करत आहेत. हे दोन्ही संघ हिप हॉप ही डान्स स्टाईल परफॉर्म करत आहेत. जागतिक हिप हॉप मध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करावे या विचारांनी त्यांनी प्रयत्न सुरु ठेवला. त्यांचे लक्ष्य होते अमेरिकेत होणारी ही स्पर्धा जिंकणं.

ही स्पर्धा हिप हॉप करणाऱ्या कलाकारांसाठी अत्यंत मानाची समजली जाते. याआधी लायन्स आणि मायनस यांनी भारतात होणाऱ्या हिप हॉप स्पर्धेत गोल्ड मेडल मिळवलंय. त्यामुळे त्यांना या स्पर्धेमध्ये आपली कला सादर करण्याची संधी मिळाली.

स्पर्धा झाली ऑनलाईन

लायन्स हा ७ जणांचा ग्रुप आहे. त्यांनी अडल्ट क्रु या प्रकारात सादरीकरण केलं. तर मायनस 3 यांनी मिनी क्रु या विभागात भाग घेतला. दरवर्षी ही स्पर्धा अमेरिकेत होते. पण यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे ही स्पर्धा ऑनलाईन घेण्यात आली. या स्पर्धेत १७० देशांनी एन्ट्री पाठवल्या होत्या. अटीतटीच्या या स्पर्धेत लायन्स आणि मायनस ३ या दोन्ही संघाची निवड होणं हा अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे.

लासन्सच्या टीमचा नृत्यदिग्दर्शक बालाजी म्हणाला, मागील वर्षी आपण या स्पर्धेत ५२ व्या क्रमांकावर होतो. ही गोष्ट त्याच्या मनाला लागली. भारताला तिथून पहिल्या क्रमांकावर आणणे हे आमचे स्वप्न होते. कांस्य पदक आणि रौप्य पदक यांचे एकूण गुण सारखेच होते. तर गोल्ड मेडल मिळालेल्या संघात आणि लायन्सच्या परफॉर्मन्स मध्ये फक्त ०.१२ इतका छोटा फरक होता. पुढच्या वर्षी सुवर्णपदक आणायचे आमचे ध्येय आहे.

मायनस 3 मधील सुजिन म्हणाला, पहिल्या प्रयत्नामध्ये आम्ही टॉप १० मध्ये येणं ही देखील एक खूप मोठी गोष्ट आहे. पुढच्या वर्षीच्या तयारीसाठी ही गोष्ट प्रेरणा देणारी आहे.

मी होणार सुपरस्टार जल्लोष डान्सचा या स्पर्धेत कोणता कलाकार सुपरस्टार होण्याचा मान मिळवतोय हे लवकरच कळेल. त्यासाठी पामी होणार सुपरस्टार जल्लोष डान्सचा शनिवार आणि रविवार रात्री ९ वाजता स्टार प्रवाहवर.

हेही वाचलं का ?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news