udaynraje vs shivendraraje : मी लोळत जाईन नाहीतर गडगडत जाईन, उदयनराजेंचे शिवेंद्रराजे यांना भन्नाट उत्तर | पुढारी

udaynraje vs shivendraraje : मी लोळत जाईन नाहीतर गडगडत जाईन, उदयनराजेंचे शिवेंद्रराजे यांना भन्नाट उत्तर

प्रतापगड : पुढारी वृत्तसेवा

udaynraje vs shivendraraje : खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दोन दिवसांपूर्वी साताऱ्यात दुचाकीवरून जाऊन विकास कामांचे उद्घाटन केले होते. त्यावर आमदार शिवेंद्रराजे यांनी टोला लगावत नगरपालिका नीट चालवली असती तर दुचाकी चालवायची वेळ आली नसती, असे म्हंटले होते. यावर उदयनराजे यांनी आज किल्ले प्रतापगड येथे त्याला भन्नाट प्रत्युत्तर दिले.

उदयनराजे म्हणाले, मला परवडत नाही म्हणून मी दुचाकीवरून गेलो, मी चालत ही जाईन, रांगत ही जाईन, वाटले तर लोळत ही जाईन नाहीतर लोटांगण घालत ही जाईन. एवढेच काय गडगडत ही जाईल, सीट वर उभा राहून जाईल नाहीतर डोक्यावर चालत जाईन, तुम्हाला काय करायचेय? अशा भाषेत उत्तर दिल्याने राजेंमधील नवा वाद सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

udaynraje vs shivendraraje : शिवेंद्रराजे काय म्हणाले…

सातारा नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यामध्ये चांगलाच वाद पेटला आहे. खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारच्या विकासकामांच्या शुभारंभाचा चांगला धडाका उडवला आहे. यावर बोलताना शिवेंद्रराजे यांनी उदयनराजेंनी चालवलेली दुचाकी आणि पोस्टर बाजीचा चांगलाच समाचार घेतला आहे.

उदयनराजेंनी दुचाकी चालवण्यापेक्षा पाच वर्षे सातारची नगरपालिका व्यवस्थित चालवली असती तर एवढी पोस्टर बाजी करण्याची वेळ आली नसती. पोस्टर बाजीवर खर्च करण्यापेक्षा सातारच्या विकासकामांवर खर्च केला असता तर बरं झालं असतं. नगरपालिकेची निवडणूक जवळ आल्याने खा. उदयनराजे यांची ही नौटंकी सुरू असल्याचे टोला आ.शिवेंद्रसिंहराजे यांनी लगावला.

खासदार उदयनराजेनीं एकदा आरोग्य मंत्र्यांची भेट घेतली आणि मेडिकल कॉलेजचा प्रश्न सुटला असं नसून मेडिकल कॉलेजसाठी सर्वांनी प्रयत्न केले आहेत.

रामराजे ना शिव्या देता आणि त्यांच्याशीच चर्चा करता ?

मग १० वर्षे खासदार असताना आरोग्यमंत्री यांनी भेट दिली नाही का ? की आरोग्यमंत्री यांचा पत्ता माहीत नव्हता, असा खोचक सवाल या वेळी आ.शिवेंद्रराजे यांनी विचारला.

रामराजे ना शिव्या देता आणि त्यांच्याशीच चर्चा करता ?असा टोला आ शिवेंद्रसिंहराजे यांनी लगावला.सातारा सर्किट हाऊस वर झालेल्या उदयनराजे आणि रामराजे यांच्या भेटीवर बोलताना शिवेंद्रराजे म्हणाले ज्या राम राजांना दाखवतो आणि बघतो ची भाषा केली त्यांच्याशी चर्चा करायला कशाला जायचं. आपलं घराणं कुठलं? छत्रपती घराणे आहे, असा खोचक टोला त्यांनी यावेळी लगावला.

हेही वाचलं का?

Back to top button