BBM 3 : तुम्हालाही मला चार शब्द ऐकवायचे आहेत का ? - स्नेहा वाघ - पुढारी

BBM 3 : तुम्हालाही मला चार शब्द ऐकवायचे आहेत का ? - स्नेहा वाघ

मुंबई; पुढारी ऑनलाईन :

बिग बॉस मराठीच्या (BBM) कालच्या भागामध्ये पार पडलेल्या नॉमिनेशन कार्यामुळे सुरेखाताईंची नाराजी सगळ्यांना दिसून येते आहे. त्यांनी काल ती सगळ्यांसमोर  व्यक्त देखील केली. आज स्नेहा वाघ, दादुस आणि सुरेखाताई याबद्दल बोलताना दिसणार आहेत. सुरेखाताईंनी त्यांची नाराजी स्पष्टपणे स्नेहा वाघ हिच्यासमोर व्यक्त केली.

सुरेखाताईंच्या असं बोलण्याने स्नेहा कुठेतरी दुखावली गेली. स्नेहा सुरेखाताईंना म्हणाली, “अरे ताई असं का बोलताय.” सुरेखा ताई म्हणाल्या, “या शब्दातच सांगते तुला, आम्हांला तिघांनाही तसं जाणवलं आहे. आपल्याला जेव्हा कोणी नसतं तेव्हा आपण खांदा शोधतो आणि दुसरे मिळाले की ज्या पध्दतीने तू गेलीस…”

स्नेहाने दादुस यांना देखील विचारले, “आता तुम्हालाही काही बोलायचे आहे. मला काही चार शब्द ऐकवायचे आहेत का? की तुम्हाला असं वाटतं आहे का माझ्याकडे नवीन खांदा आला तर तुम्हाला तिघांना मी विसरले? दादुसचं म्हणण पडलं तू विसरली नाहीस.

पण बघूया हे संभाषण कुठवर गेलं?तेव्हा बघा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

हेही वाचलं का? 

Back to top button