गाथा नवनाथांची मालिकेने गाठला ६०० भागांचा टप्पा | पुढारी

गाथा नवनाथांची मालिकेने गाठला ६०० भागांचा टप्पा

पुढारी ऑनलाईन डेस्क : आतापर्यंत नाथपरंपरा, नाथांचे चमत्कार, त्यांच्या शक्तीची अनुभूती हे सर्व मालिकेत पाहायला मिळाले. यापुढेही नाथांचे वेगवेगळे चमत्कार मालिकेत पाहायला मिळतील. आता मालिकेत राजपुत्र कृष्णधर याचा चौरंगीनाथ होण्याचा प्रवास सुरू झाला आहे. मालिकेत लवकरच चौरंगीनाथ पाहायला मिळतील. राजपुत्राचा जन्म कसा झाला आणि त्यांचे चौरंगीनाथ हे रूपांतर कसे होणार, हे आपल्याला महाएपिसोडमध्ये पाहायला मिळेल.

गाथा नवनाथांची मालिका आता ६०० भागांचा टप्पा पार करत आहे. आतापर्यंतच्या नाथांचा प्रवास आणि पुढील वाटचाल यांत मालिकेने ६०० भाग पूर्ण केले. आतापर्यंत नाथपरंपरा, नाथांचे चमत्कार, त्यांच्या शक्तीची अनुभूती हे सर्व मालिकेत पाहायला मिळाले. यापुढेही नाथांचे वेगवेगळे चमत्कार मालिकेत पाहायला मिळतील. ‘गाथा नवनाथांची’ या मालिकेच्या पुढील भागांत नाथ संप्रदायाची परंपरा पाहायला मिळणार असून मालिकेत आता कोणते चमत्कार घडणार, नाथ अशुभ शक्तींचा नाश कसा करणार, हे पाहणे रंजक ठरेल. भर्तरीनाथ वर आलेले संकट परतविण्यास मच्छिन्द्रनाथ मदत करू शकतील का हे पाहण्यास मिळेल.

Back to top button