Apurva Nemlekar : अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरचे नवरात्रीनिमित्त खास फोटोशूट - पुढारी

Apurva Nemlekar : अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरचे नवरात्रीनिमित्त खास फोटोशूट

पुढारी ऑनलाईन डेस्क: ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेमूळे घराघरात पोहचलेल्या अपूर्वा नेमळेकरने (Apurva Nemlekar) नवरात्रीनिमित्त खास फोटोशूट केले आहे. हे लेटेस्ट फोटो तिने  सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Apurva Nemlekar

शारदीय नवरात्रौत्सवाच्या पहिल्या दिवशी पिवळा रंग होता. अपूर्वाने (Apurva Nemlekar) नवरात्रीच्या पहिला दिवशी कोल्हापूरची श्री अंबाबाईचे स्‍मरण केले.

Apurva Nemlekar

श्री अंबाबाई महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक आहे.

Apurva Nemlekar

नवरात्रीच्या दुसर्‍या दिवशी अपूर्वाने  हिरव्या रंगाची साडी घातली हाेती. या दिवशी तिने मुंबईमधील सहा शतके जुने असलेले  मुंबादेवीचे रुप साकारत देवीला नमन केले.

Apurva Nemlekar

नवरात्रीच्या तिसर्‍या दिवशी करडा रंग होता. अपूर्वाने या दिवशी कर्नाटकमधील उडपी येथील जया गौरी दुर्गा परमेश्वरी साकारली.

Apurva Nemlekar

नवरात्रीच्या चौथ्या दिवशी रंग नारंगी आहे. अपूर्वाने आज सलग चौथ्या दिवशी अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील राशीन देवीला नमन केले.  राशीन देवीला देवी यमाई असेही म्हणतात. Apurva Nemlekar

अपूर्वाने हे फोटो सोशल मीडिवर शेअर करत, देवीच्या प्रत्येक रुपाचं माहात्म्यही सांगितले आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंवर चाहत्यांच्या संमिश्र कमेंट येत आहेत. अप्रतिम, खूप छान, एवढीच हौस असेल तर तसे फोटोशूट करून घरात लावा. अशा कमेंटही तिला येत आहेत. ट्रोल करणार्‍यांना तिने सडेतोड उत्तर दिले आहे.

Apurva Nemlekar

अपूर्वा सोशल मीडियावर  सक्रिय असते. ती चाहत्यांसाठी नेहमी हटके फोटो शेअर करत असते.  ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतील तिची ‘शेवंता’ ही भूमिका खूप गाजली होती.

हेही वाचलं का?

पहा व्हिडिओ : नवदुर्गा या स्त्रीमध्येच लपलेल्या आहेत : भाग्यश्री मुळे | महेंद्र ज्वेलर्स प्रस्तुत विशेष मुलाखत

 

Back to top button