

पुणे ; पुढारी वृत्तसेवा : कमी दाबाचा पट्टा विरला, शाहीन चक्रीवादळ परस्पर पाकिस्तानकडे गेले, असे म्हणत नि:श्वास टाकणार्या महाराष्ट्रावर पुन्हा कमी दाबाच्या पट्ट्याचे ढग दाटले असून, 16 जिल्ह्यांना 5 ते 7 ऑक्टोबर यादरम्यान यलो अलर्ट चा इशारा देण्यात आला आहे.
मान्सून 6 ऑक्टोबरपासून परतीच्या प्रवासाला निघत असल्याने उत्तर भारतात हवेची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. परिणामी, 8 ऑक्टोबरपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
रायगड (5 ते 7), रत्नागिरी (5 ते 7 ), सिंधुदुर्ग (5 ते 8), नाशिक (5 ते 8), नगर (5 ते 7), पुणे (5 ते 8), कोल्हापूर (5 ते 8), सातारा (5 ते 8), सांगली (6 ते 8), सोलापूर (6 ते 8), औरंगाबाद (5 ते 8), जालना (5 ते 7), बीड (6 ते 8), लातूर (6 ते 8), उस्मानाबाद (6 ते 8) आणि विदर्भ काही भागात (5).