अंकित मोहन स्टारर ‘बाबू’च्या चित्रीकरणाला सुरुवात | पुढारी

अंकित मोहन स्टारर 'बाबू'च्या चित्रीकरणाला सुरुवात

पुढारी ऑनलाईन : ‘बाबू’ चित्रपटाचे टिझर पोस्टर प्रदर्शित झाले. त्यानंतर प्रेक्षकांमध्ये त्याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. रांगड्या शरीराच्या, ऐटीत उभ्या असणाऱ्या अंकित मोहन याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. ‘बाबू’ या चित्रपटात अंकित मोहन मुख्य भूमिकेत आहेत.

श्री कृपा प्रोडक्शन निर्मित मयूर मधुकर शिंदे यांनी दिग्दर्शन केले आहे.

बाबू के. भोईर निर्माता आहेत. या चित्रपटाचे मुंबईमध्ये चित्रीकरण सुरु झाले आहे.

ankit mohan
अंकित मोहन स्टारर ‘बाबू’च्या चित्रीकरणाला सुरुवात

‘बाबू’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे नक्की. अंकित अनेक हिंदी मालिका तसेच मराठी चित्रपटांमधून घराघरात पोहोचलाय. अंकितसोबत या चित्रपटात नेहा महाजन, रुचिरा जाधव यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

त्यामुळे येत्या काळात ‘बाबू’ चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये दाखल होणार आहे.

हेही वाचलं का?

Back to top button