Aryan Shahrukh khan : मुंबई रेव्ह पार्टीच्या मागे ‘बटाटा गॅंग’चा हात?  | पुढारी

Aryan Shahrukh khan : मुंबई रेव्ह पार्टीच्या मागे 'बटाटा गॅंग'चा हात? 

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबईची रेव्ह पार्टी आणि शाहरुख खानच्या मुलाची म्हणजे आर्यन खानची (Aryan Shahrukh khan) अटक ही मनोरंजनविश्वातील आणि गुन्हेविश्वातील मोठी बातमी ठरली आहे. पण, हा आर्यन खान एनसीबीच्या जाळ्यात अडकला की, अडकवला गेला… यावर चर्चेला उधाण आलेलं आहे.

अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतर एनसीबीची ही मोठी कारवाई आहे, असं मानलं जात आहे. त्यातून बाॅलिवुडचं ड्रग्ज कनेक्शन बाहेर पडत आहे. आर्यन खान आणि इतर अभिनेत्यांची मुलं सापडल्यामुळे त्यांच्या मोबाईलमधून हे कनेक्शन बाहेर पडताना दिसत आहे.

एनसीबीच्या प्राथमिक तपासात क्रूझवरील रेव्ह पार्टीच्या आयोजनामागे बटाटा गॅंगचा मोठा हात असण्याची शक्यता आहे, अशी माहिती समोर आली आहे. इतकंच नाही तर, गुरूग्रा आणि दिल्लीपर्यंत तपासात संशय आढळून आलेला आहे.

परंतु, आर्यन खानने (Aryan Shahrukh khan) दिलेल्या जबाबात असं म्हंटलंय की, “मला या इव्हेंटमध्ये गेस्ट म्हणून बोलविण्यात आलं होतं. या रेव्ह पार्टीशी माझा काहीही संबंध नाही.” अशा पार्श्वभूमीवर आर्यन खानला अडकविण्यात आलं की स्वतः अडकला गेला, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

सूत्रांकडून असं सांगितलं जातं आहे की, मुंबईमध्ये अंमलीपदार्थ पोहोचण्याचं काम बटाटा गॅंग करते. मागील काही दिवसांमध्ये त्यांची सक्रियता खूप वाढलेली आहे. अंमली पदार्थ तरुणांपर्यंत पोहोचावेत यासाठी बटाटा गॅंग अशा रेव्ह पार्ट्यांचे आयोजन करते.

क्रूझवरील रेव्ह पार्टीतदेखील बटाटा गॅंगनेच ड्रग्ज पुरवली होती. कारण, मुंबईत सर्वात मोठा ड्रग्ज सप्लायर फारुख बटाटा आणि त्याचा मुलगा शादाब बटाटा हे काही लोकांना हाताशी घेऊन संपूर्ण मुंबईत ड्रग सप्लाय करत असतात, अशीही माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.

पहा व्हिडीओ : “मी काॅमेडीमध्ये एक्शन काॅमेडी आणली”, अभिनेते अशोक सराफ

Back to top button