‘फ्री हिट दणका’ या दिवशी होणार रिलीज | पुढारी

'फ्री हिट दणका' या दिवशी होणार रिलीज

पुढारी ऑनलाईन : एसजीएम फिल्म्स प्रस्तुत ‘फ्री हिट दणका’ या चित्रपटाचे नवीन पोस्टर रिलीज झाले. हा चित्रपट कोणत्या दिवशी रिलीज होणार याची तारीखही जाहीर झालीय. हा चित्रपट १७ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सुनील मगरे यांनी ‘फ्री हिट दणका’ चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटात फँड्री’ फेम सोमनाथ अवघडे, अपूर्व एस.यांच्यासह ‘सैराट’ चित्रपटातील जोडी अरबाज (सल्या) आणि तानाजी (लंगड्या) यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

२२ ऑक्टोबरपासून सिनेमागृहे सुरु होणार असल्‍याचे जाहीर झाले आहे. इतके महिने आतुरतेने वाट पाहणाऱ्या चित्रपटसृष्टी आणि चित्रपटप्रेमींमध्ये एक उत्साहाचे आणि सकारात्मक वातावरण निर्माण झाले. अनेक महिन्यांपासून बंद असलेल्या चित्रपटगृहांनाही आता प्रेक्षकांची आस लागली आहे.

free hit danka fil
सोमनाथ अवघडेचा फ्री हिट दणका चित्रपट १७ डिसेंबरला रिलीज होणार आहे.

लवकरच प्रेक्षक आता आपल्या आवडत्या चित्रपटाचा आनंद थिएटरमध्ये बसून घेतील.

मागील अनेक महिन्यांपासून रखडलेल्या प्रदर्शनाच्या तारखाही आता जाहीर होऊ लागल्या आहेत.

त्यापैकीच एक ‘फ्री हिट दणका’ चित्रपट आहे.

या चित्रपटाची कथा आणि पटकथा सुनील मगरे यांची आहे. लेखन आणि संवाद संजय नवगीरे यांचे आहेत.

आकाश अलका बापू ठोंबरे, मेघनाथ गुरुनाथ सोरखडे आणि सुनिल मगरे चित्रपटाचे निर्माते आहेत.

नितीन बापू खरात, सुधाकर लोखंडे आणि सत्यम तरडे यांनी सहनिर्मात्यांची धुरा सांभाळली आहे.

प्रेमकथा असलेल्या ‘फ्री हिट दणका’ या चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले होते.

आता लवकरच प्रेक्षकांना या प्रेमाचा दणका चित्रपटगृहात पाहाता येणार आहे.

हेही वाचलं का?

Back to top button