चंद्र जात आहे पृथ्वीपासून दूर | पुढारी

चंद्र जात आहे पृथ्वीपासून दूर

नवी दिल्ली : पृथ्वीचा उपग्रह असलेला चंद्र सध्या पृथ्वीपासून दूर जात आहे. चंद्र दूर जाण्याचा वेग कमी असल्याने त्याबद्दल मानवाला काहीच उमगत नाही. मात्र, एक दिवस असा येईल, त्या दिवशी चंद्र पूर्णपणे गायब झालेला असेल, असा दावा एका नव्या संशोधनात करण्यात आला आहे.

‘द अटलांटिक’च्या अहवालात दिलेल्या माहितीनुसार, चंद्र पृथ्वीपासून दूर सरकण्याची प्रक्रिया समजून घेण्यासाठी शास्त्रज्ञांनी अन्य स्रोतांबरोबरच ‘बिमिंग लेजर्स’चा वापर करून ‘लूनर रिट्रीज’ मोजले. यामध्ये चंद्र हा आपल्या पृथ्वीपासून दूर सरकत असल्याचे निष्पन्न झाले.

शास्त्रज्ञांच्या मते, सुमारे साडेचार अब्ज वर्षांपूर्वी चंद्राची निर्मिती झाली होती. त्यावेळी पृथ्वीच्या सर्व बाजूने अवकाशात फिरणार्‍या मोठमोठ्या खडकांनी चंद्राची निर्मिती झाली. निर्मितीवेळी पृथ्वी व चंद्र यांच्यातील अंतर फारच कमी होते. यामुळे आतापेक्षा त्यावेळी 10 पट अधिक वेगाने फिरत होता. यामुळे तेव्हा चार तासांचा दिवस व बाकीच्या वेळी रात्र असावयाची.

संशोधकांच्या मते, रहस्यमयी वस्तूची पृथ्वीला धडक बसली आणि त्यापासून खडक व अन्य पदार्थ अवकाशात विखुरले गेले. या पदार्थांनीच चंद्राची निर्मिती झाली. सुरुवातीला चंद्रअत्यंत उष्ण होता आणि तो लालग्रहासारखा रात्रीच्या सुमारास चमकत होता.

मात्र, त्यानंतर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेत आला आणि पृथ्वीभोवती फिरू लागला. ‘द अटलांटिक’मधील अहवालानुसार, आता दुसरे ग्रह चंद्राला खेचू लागले आहेत. तसेच या ग्रहांची गुरुत्वाकर्षण शक्ती पृथ्वीपेक्षाही जास्त आहे.

यामुळे चंद्रसध्या दर वर्षाला पृथ्वीपासून आठ इंचाने दूर सरकत आहे. यामुळे चंद्रावर गेल्या काही काळात अनेक खगोलीय घटनाही घडल्या आहेत. यामुळे चंद्रावर उल्कापिंडाचा वर्षाव होऊ लागला आहे. तसेच पृथ्वीचे हवामान चक्रही बदलू लागले आहे.

Back to top button