प्रत्येक गोष्टीसाठी सज्ज राहावे लागते! | पुढारी

प्रत्येक गोष्टीसाठी सज्ज राहावे लागते!

अभिनेत्री शहनाझ गिल मागच्या काही दिवसांपासून ‘देसी वाइब्स विथ शहनाझ गिल’ या शोमुळे चर्चेत आहे. शोमध्ये आतापर्यंत शाहीद कपूरपासून ते विकी कौशल आणि आयुष्मान खुराना यांनी हजेरी लावली आहे. अलीकडेच या शोमध्ये भुवन बामने हजेरी लावली होती. यावेळी शहनाझने भुवनबरोबर त्याच्या खासगी आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल प्रश्न विचारले. यावेळी शहनाझनेही तिच्या खासगी आयुष्याबद्दल काही खुलासे केले. शहनाझ दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या प्रेमात होती. दोघे लग्नही करणार होते; मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच होते. यावर शहनाझ म्हणाली, आयुष्यात तुम्हाला माहीत नसते की, तुमच्या भविष्यात काय आहे? तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी तयार राहावे लागते. आता माझ्याकडे काही गोष्टी आहेत करण्यासारख्या तर मी करत आहे. पुढे जाऊन मी काम करण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. प्रयत्न करत राहीन की, मला काम मिळत राहील. या सगळ्यात मला लग्न करायला नाही मिळाले, तरीही हरकत नाही. मला आता लग्न या गोष्टीवर विश्वास
नाही.

Back to top button