साईशा भोईर : 'रंग माझा वेगळा'मधील कार्तिकी विषयी 'या' गोष्टी माहिती आहेत का? - पुढारी

साईशा भोईर : 'रंग माझा वेगळा'मधील कार्तिकी विषयी 'या' गोष्टी माहिती आहेत का?

पुढारी ऑनलाईन : ‘रंग माझा वेगळा’ ही छोट्या पडद्यावरील मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे. या मालिकेत दीपा आणि कार्तिकच्या दोन्ही मुली मोठ्या झाल्या आहेत. दीपा आणि कार्तिक यांच्या नावावरून दोघींची दीपिका आणि कार्तिकी हे नाव पडलंय. तुम्हाला माहितीये का? या मालिकेत कार्तिकीची भूमिका साकारणारी बालकलाकार साईशा भोईर हिच्याविषयी माहितीये का? साईशा भोईर खूप क्यूट आणि हुशारही आहे.

साईशा ही कल्याणची आहे. बालपणापासूनच तिला नृत्याची आवड आहे. तिला अभिनयही करायला आवडतो. त्याचबरोबर, तिला जेवण बनवायलाही खूप आवडते.

दरम्यान, साईशाच्या आईला ‘रंग माझा वेगळा’ मालिकेच्या ऑडिशनविषयी समजलं. त्यावेळी त्यांनी साईशाची ऑडिशन क्लिप मेकर्सना पाठवली. त्यानंतर तिची या मालिकेसाठी निवडही झाली.

साईशाची सोशल मीडियावरही हवा

‘रंग माझा वेगळा’ ही मालिका साईशा घरी पाहत होती. यातील पात्रांचेदेखील नावं तिला तोंडपाठ होती. त्यामुळे ती आनंदात होती. सेटवर पहिल्या दिवशी गेल्यानंतर तिला आनंद झाला होता.

जी मालिका ती घरी पाहत होती. त्यातील कलाकारांसोबत साईशाला काम करायला मिळणार होतं. सोशल मीडियावरही साईशा ॲक्टिव्ह आहे. तिचे इन्स्टाग्राम अकाऊंटही आहे.

साईशा भोईर ही चाईल्ड मॉडेल आहे. तिने अनेक ब्रँडसाठी रॅम्पवॉक केलं आहे. तिचे युट्यूब चॅनलदेखील आहे. ती आपले फोटोज आणि व्हिडिओ इन्स्टाग्रामवर अपलोड करत असते.

Back to top button