bollywood big releases : जाणून घ्या तब्बल २२ चित्रपटांच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर - पुढारी

bollywood big releases : जाणून घ्या तब्बल २२ चित्रपटांच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर

पुढारी ऑनलाईन डेस्क : bollywood big releases : चित्रपटगृहे ऑक्टोबरपासून खुले करणार असल्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला यानंतर बॉलिवुडमध्ये चित्रपट प्रदर्शित करण्याची स्पर्धा सुरु झाली आहे. अनेक मोठ्या दिग्दर्शकांनी चित्रपट प्रदर्शित करण्याच्या तारखा जाहीर केल्या आहेत.

बॉलिवुडमधील bollywood big releases अजय देवगन, रणवीर सिंह, आलिया भट्ट, टाइगर श्रॉफ, अक्षय कुमार आणि कार्तिक आर्यन सारख्या कलाकारांच्या चित्रपटांच्या प्रदर्शित तारखा समोर आल्या आहेत. काहींनी ईद दिवशीची तारीख पकडली. तर काहींनी दिवाळीचा दिवस पकडला आहे.

हे चित्रपट होणार प्रदर्शित

१. बॉलिवुड मधील प्रसिध्द दिग्दर्शक  रोहित शेट्टी यांनी दिग्दर्शित केलेला अक्षय कुमार आणि कतरिना कैफ यांचा ‘सूर्यवंशी’ २२ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होत आहे.

२. जॉन अब्राहम याचा ‘सत्यमेव जयते 2’ २६ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

३. सुनिल शेट्टी चा मुलगा अहान शेट्टी याचा पहिला चित्रपट ‘तडप’ ३ डिसेंबर २०२१ रोजी प्रदर्शित होणार आहे.

४. रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणचा चित्रपट ’83’ ख्रिसमस २०२१ ला रिलीज होणार आहे.

५. साऊथचा सुपरहिट चित्रपट ‘जर्सी’ चा हिंदी रिमेक ३१ डिसेंबर २०२१ रोजी रिलीज होईल. यात शाहिद कपूर मुख्य भूमिकेत आहे.

६. ‘बंटी और बबली 2’ १९ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. यात सैफ अली खान, राणी मुखर्जी आणि अभिषेक बच्चन यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

७. कार्तिक आर्यनचा ‘भूल भुलैया’ १९ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.

८. आयुष्यमान खुराना आणि वाणी कपूर यांचा ‘चंडीगढ़ करे आशिकी’ हा चित्रपट १० डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.

९. . ‘गंगूबाई काठियावाडी’ ६ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. यात आलिया भट्ट आणि अजय देवगण आहेत, संजय लीला भन्साळी दिग्दर्शित हा चित्रपट आहे.

१०. अक्षय कुमार आणि मानुषी छिल्लरचा चित्रपट ‘पृथ्वीराज’ २१ जानेवारी २०२२ रोजी प्रदर्शित होणार असून या चित्रपटाचे दिग्दर्शन चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी केले आहे.

११. आमिर खान आणि करीना कपूरचा ‘लाल सिंह चड्ढा’ २०२२ च्या व्हॅलेंटाईन डे ला प्रदर्शित होत आहे.

१२. रणवीर सिंहचा ‘जयेशभाई जोरदार’ २५ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.

१३. अक्षय कुमार आणि कृती सेनन यांचा ‘बच्चन पांडे’ ४ मार्च २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे.

१४. रणबीर कपूरचा ‘शमशेरा’ १८ मार्च २०२२ ला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात वाणी कपूर आणि संजय दत्त देखील आहेत.

१५. यश आणि संजय दत्तचा ‘केजीएफ 2’ हा चित्रपट १४ एप्रिल २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे.

१६.टायगर श्रॉफचा ‘हिरोपंती 2’ २९ एप्रिल २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे.

१७. अजय देवगण आणि अमिताभ बच्चन यांचा ‘मेडे’ २९ एप्रिल २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे.

१८.टायगर श्रॉफचा अॅक्शन चित्रपट ‘हिरोपंती’ ची प्रदर्शित तारीख ६ मे २०२२ आहे.

१९. अजय देवगणचा ‘मैदान’ ३ जूनला प्रदर्शित होणार आहे.

२०. ‘एक व्हिलन रिटर्न्स’ ८ जुलै २०२२ रोजी प्रदर्शित होईल. या चित्रपटात अर्जुन कपूर, तारा सुतारिया, जॉन अब्राहम आणि दिशा पटानी मुख्य भूमिकेत आहेत.

२१. आनंद एल राय दिग्दर्शित ‘रक्षाबंधन’ ११ ऑगस्ट २०२२ रोजी प्रदर्शित होईल.

२२. टायगर श्रॉफ आणि क्रिती सॅनॉनचा ‘गणपत’ २३ डिसेंबर २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचलत का :

Back to top button