Mumbai Metro : कुलाबा सीप्झ मेट्रोची चाचणी मरोळ मरोशी येथे भुयारी मार्गाच्या ठिकाणी होणार - पुढारी

Mumbai Metro : कुलाबा सीप्झ मेट्रोची चाचणी मरोळ मरोशी येथे भुयारी मार्गाच्या ठिकाणी होणार

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : Mumbai Metro : दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महत्वाची मेट्रो मार्गिका असलेल्या कुलाबा ते सीप्झ मेट्रो -३ च्या रेल्वेची चाचणी मरोळ मरोशी येथे करण्यात येणार आहे.

राज्य शासनाने स्थगिती दिलेल्या आरे येथील जागेच्या हद्दीबाहेर ही चाचणी करण्यात येणार आहे. चाचणी दरम्यान आरेतील एकाही वृक्षाला धक्का लागता कामा नये,असा आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

सध्या मरोळ मरोशी या रस्त्याच्या भुयारी मार्गाचे काम चालू असून या कामाच्या जवळच रॅम्प बनवून काम हाती घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या चाचणीच्या कामाकरिता कोणतेही झाड तोडण्यात येणार नाही.

मुंबई येथील वाहतुक कोंडी दूर करण्यासाठी व प्रदूषण कमी करण्यासाठी कुलाबा ते सीप्झ या मार्गावर मेट्रो Mumbai Metro लाईन-३ चे काम प्रगतीपथावर आहे.

या मार्गिकेकरिता अल्स्टॉम या कंपनीने श्रीसिटी आंध्रप्रदेश येथे ८ डब्यांची ट्रेन तयार केलेली आहे. या गाडीची त्या ठिकाणी तांत्रिक चाचणी झालेली आहे.

आता मुंबईत १० हजार किमी अंतर चालवून चाचणी घेण्यात येणार आहे. त्यानंतर कुलाबा ते सीप्झ या मार्गिकेवर देखील ट्रेन चालविण्यात येणार आहे. या चाचण्या यशस्वी झाल्यानंतर अशा पध्दतीच्या ३१ ट्रेन Mumbai Metro या मार्गावर धावण्याकरिता उपलब्ध होणार आहेत.

हे ही वाचलं का?

Back to top button