तासगाव ; पुढारी वृत्तसेवा : माजी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री स्व. आर. आर. पाटील यांचे बंधू करवीरचे पोलिस उपअधीक्षक आर. आर. पाटील गुरुवारी सेवानिवृत्त होत आहेत. शेवटच्या दिवशी आई भागिरथी यांना सॅल्यूट करुन नोकरीवर जाण्यासाठी ते कामासाठी दाखल झाले.
ज्या आईने अनेक संकटाला सामोरे जात शिकवलं व घडवलं तिला सॅल्यूट करुनही उपकार फेडता येणार नाहीत.नोकरीच्या शेवटच्या दिवशी तिला सॅल्यूट करुन तिचा सन्मान करणे एवढे तरी मी करु शकतो, अशी भावना यावेळी पोलिस उपअधिक्षक पाटील यांनी व्यक्त केली.
१९७५ साली वडीलांचे निधन झाले. त्यावेळी तीन मुले आणि दोन मुली यांच्या संसाराचा गाडा नेटाने हाकत आई भागिरथीने आम्हाला चांगले शिक्षण दिले. तिने दिलेल्या संस्काराची शिदोरी घेऊन आयुष्यभर वाटचाल केली. तिचा आधार व पाठिंबा याच्या जोरावरंच यश मिळवू शकलो, असे पोलिस उपअधिक्षक आर. आर. पाटील म्हणाले.
यावेळी पाटील यांच्या मातोश्री भागिरथीसह त्यांच्या बहिणी सुमन व रंजना आणि पत्नी कुंजलता उपस्थित होत्या.
हेही वाचलं का ?