worst dress : प्रियांका ते कंगनापर्यंत ! या १० अभिनेत्रींच्या अतरंगी अवताराने सगळेच हैराण - पुढारी

worst dress : प्रियांका ते कंगनापर्यंत ! या १० अभिनेत्रींच्या अतरंगी अवताराने सगळेच हैराण

पुढारी ऑनलाईन डेस्क : worst dress : बॉलिवूडच्या नायिका वेळोवेळी त्यांच्या लूकचे प्रयोग करत राहतात. स्टायलिश लूकसाठी या नायिका फॅशनेबल कपडे घालायला कधीच विचार करत नसतात. अनेकवेळा हे कपडे पाहून चाहते बेहोश होऊन जातात. यामध्ये प्रियांका चोप्रापासून ते कंगना राणावतपर्यंत अपवाद राहिलेल्या नाहीत.

priyanka chopraप्रियांका चोप्रा

अभिनेत्री प्रियांका चोप्रा पती निक जोनाससोबत एका कार्यक्रमाला गेली होती. त्या ठिकाणी तिने हा ड्रेस worst dress परिधान केला होता. प्रियांका चोप्रा या ड्रेसमध्ये खूप हॉट दिसत होती, मात्र या ड्रेसवरून चाहत्यांनी तिला चांगलेच ट्रोल केले. त्यांनी विचारणी केली की, टेलरने हा ड्रेस एका बाजूने का शिवला नाही?

kangana

कंगना राणावत

अभिनेत्री कंगना राणावत आजकाल साडीमध्ये दिसते,पण करिअरच्या सुरुवातीला ती खूप स्टायलिश कपडे घालत होती. कंगना राणावत या ड्रेसअपमध्ये रॅम्पवर दिसून आली होती. जेव्हा ती मागे वळली तेव्हा लोक पाहतच राहिले होते.

मल्लिका शेरावत

जेव्हा अभिनेत्री मल्लिका शेरावतने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले, तेव्हा ती तिच्या ड्रेसेससह बरेच प्रयोग करायची. हा ड्रेस त्या दिवसांचा आहे. हे बघून, ती बिकिनी आहे की गाऊन आहे हे समजणे कठीण आहे …

कश्मीरा शाह

अभिनेत्री कश्मिरा शाह हा बॅकलेस ड्रेस परिधान करून एका पार्टीत पोहोचली होती. ती संपूर्ण पार्टीत हा ड्रेस सांभाळत राहिली. पार्टीची चित्रे पाहिल्यानंतर चाहत्यांनी तिला एकच प्रश्न विचारला की ती असा ड्रेस घालून का गेली होती?

निया शर्मा

अभिनेत्री निया शर्मा टीव्हीची सर्वात स्टायलिश अभिनेत्री आहे. अतिशय बोल्ड कपडे घालण्यापासून ती कधीही मागे हटली नाही. हा फोटो बरेच काही सांगून जातो.

nusarat

नुसरत भरूचा

अभिनेत्री नुसरत भरूचा एका इव्हेंटमध्ये हा ड्रेस परिधान करून पोहोचली. नुसरतच्या या ड्रेसची प्रियांका चोप्राच्या ड्रेसमधून कॉपी केल्याची त्यावेळी चर्चा रंगली होती.

poonam pandey

पूनम पांडे

अभिनेत्री पूनम पांडे तिच्या बोल्डनेससाठी ओळखली जाते. ती अनेकदा अशी छायाचित्रे शेअर करते की त्यामुळे चांगलीच चर्चा होते. हा ड्रेस घालून ती एका कार्यक्रमात पोहोचली होती. पूनमचा हा अवतार पाहून चाहत्यांनी थेट ही तर तयारी न करता या कार्यक्रमाला आल्याची विचारणा केली.

rakhi

राखी सावंत

अभिनेत्री राखी सावंतने असे कारनामे अनेक वेळा केले आहेत. राखी सावंतचे हा फोटो एका कार्यक्रमातील आहे, ज्यात ती पारदर्शक गाऊन परिधान करताना दिसली होती.

हे ही वाचलं का?

Back to top button