stocks of pulses : देशात डाळींचा मुबलक साठा | पुढारी

stocks of pulses : देशात डाळींचा मुबलक साठा

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : देशातील बाजारपेठांमध्ये डाळींच्या काळ्या बाजारावर आळा घालण्यासाठी खुल्या बाजारात उपलब्ध असलेल्या डाळींच्या साठ्यांची stocks of pulses माहिती सरकारकडून जाणून घेतली जाते.

केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने डाळीचे स्टॉकिस्ट, मिलर्स, आयातदार आणि डीलर्स यांच्यासारख्या विविध साठधारकांकडे असलेल्या डाळीच्या साठ्याची stocks of pulses माहिती गोळा करण्यासाठी एक पोर्टल सुरू करण्यात आले आहेत. या पोर्टलवर आतापर्यंत ११ हजार ६३५ साठा धारकांनी त्यांच्याकडे असलेल्या साठ्याची माहिती जमा केली आहे.

पोर्टलवरील माहितीनूसार २० सप्टेंबर २०२१ पर्यंत देशात ३०,९७,६९४.४२ मेट्रिक टन डाळीचा साठा असल्याची माहिती समोर आली आहे. अशात येत्या सणासुदीच्या काळात डाळींचा साठा stocks of pulses मुबलक प्रमाणात शिल्लक असल्याचे डाळींचे भाव वधारण्याची शक्यता कमी असल्याचे बोलले जात आहे. शिवाय कृत्रिमरित्या भाव वाढवण्याच्या प्रकाराला चाप बसेल, असा विश्वास मंत्रालयाकडून व्यक्त केला जात आहे.

विभागाकडून २२ अत्यावश्यक खाद्यवस्तूंच्या किरकोळ आणि घाऊक किमतींवर लक्ष ठेवले जाते. विभागाने काळ्या बाजाराला आळा घालणे, निर्यातीवर मर्यादा आणि आयातीला प्रोत्साहन देऊन उपलब्धता वाढवणे, अतिरिक्त साठा तयार ठेवणे आणि चढे दर नियंत्रणात आणण्यासाठी वेळेवर साठा जारी करणे stocks of pulses यासारख्या विविध उपाययोजना राबवले जात असल्याचे मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.

हे ही वाचलं का?

जेव्हा-जेव्हा साठा कमी किंवा जास्त होतो तेव्हा त्याची माहिती पोर्टलवर अद्ययावत करण्याची जबाबदारी साठेधारकांची असते, असे देखील मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

ग्राहक व्यवहार विभाग राष्ट्रीय स्तरावर परिस्थितीवर देखरेख ठेवतो. देशभरात कोणत्याही विशिष्ट डाळीची टंचाई आढळल्यास ते संबंधितांच्या लक्षात आणून देण्याचे तसेच तात्काळ आयात करून किंवा निर्यात प्रतिबंधित करून किंवा परिस्थितीनुसार अतिरिक्त साठ्यातून पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी प्रयत्न केले जातात.

हे ही वाचलं का?

Back to top button