मुंबई; पुढारी ऑनलाईन : बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट एका जाहिरातीमुळे चर्चेत आली आहे. या जाहिरातीवर नाराज झालेल्या व्यक्तीने संबंधित कंपनी आणि आलिया भट यांच्याविराेधात मुंबईतील सांताक्रुज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
तक्रारदाराचे म्हणणे आहे की, या जाहिरातीमध्ये कन्यादान चुकीच्या पध्दतीने दाखवण्यात आलं आहे. तक्रारदाराने या प्रकरणी कंपनी आणि आलिया विरोधात मुंबईतील सांताक्रुझ पोलिस ठाण्यात तक्रार दिलीय.
सोशल मीडियावरही झाला हाेता विरोध
या जाहिरातीवर सोशल मीडियामध्येही अनेक लोकांनी नाराजी व्यक्ती केली हाेती. अनेक धर्मांमध्ये अनेक अशा प्रथा आहेत, ज्याविरोधात जागृती केली जात नाही. परंतु, काही ब्रँड्स फक्त हिंदू धर्माविरोधातील प्रथावर जाहिरात करत आहेत, असे काहींनी म्हटले हाेते. तसेच काही जण विवाह संस्काराला चुकीची पद्धतीन सादर करत आहेत.
अशा जाहिरातीमुळे भावना दुखावल्या जातात, असेही काहींनी म्हटले हाेते.