कॉलिजियमकडून न्यायमूर्तीपदावर नियुक्त्यांसाठी १६ नावांची शिफारस | पुढारी

कॉलिजियमकडून न्यायमूर्तीपदावर नियुक्त्यांसाठी १६ नावांची शिफारस

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: देशातील चार उच्च न्यायालयांमध्ये न्यायमूर्तीपदावर नियुक्त्या करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलिजियमकडून १६ नावांची शिफारस करण्यात आली आहे. चार न्यायालयांमध्ये मुंबई उच्च न्यायालयाचाही समावेश असून, यासाठी चार उमेदवारांच्या नावाची शिफारस झाली आहे. कॉलिजियमकडून ए. एल. पानसरे, एस. सी. मोेरे, यु. एस. जोशी-फाळके आणि बी. पी. देशपांडे या चार न्यायिक अधिकार्‍यांच्या नावाची शिफारस कॉलिजियमने केली आहे.

मुंबई, गुजरात, ओडिशा तसेच पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयांमध्ये १६ न्यायमूर्तींच्या नियुक्त्या करण्यासाठी सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्या नेतृत्वाखालील कॉलिजियमने या शिफारशी केल्या आहेत.

कॉलिजियममध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यु. यु. ललित आणि न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर यांचाही समावेश होता. १६ पैकी १० उमेदवार न्यायिक अधिकारी म्हणजे न्यायमूर्ती म्हणून कार्यरत असून, उर्वरित 10 उमेदवार संबंधित न्यायालयांमध्ये वकिली करीत आहेत.

ओडिशा उच्च न्यायालयासाठी आदित्यकुमार मोहपात्रा, मृगंक शेखर साहू या वकिलांची तर राधाकृष्ण पटनाईक आणि शशिकांत मिश्रा या न्यायिक अधिकार्‍यांच्या नावांची शिफारस करण्यात आली आहे.

गुजरात उच्च न्यायालयासाठी एम. एम. भट्ट, समीर दवे, हेमंत प्रच्युक, संदीप भट, अनिरुध्द मायी, निरल मेहता आणि निशा ठाकोर यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे.

याशिवाय पंजाब आणि हरियाना उच्च न्यायालयासाठी अ‍ॅड. संदीप मौडगिल यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे.

शंभर नावांची शिफारस

सरन्यायाधीश म्हणून एन. व्ही. रमणा यांनी गेल्या एप्रिल महिन्यात सूत्रे स्वीकारली होती.

तेव्हापासून कॉलिजियमच्या अनेक बैठका घेऊन त्यांनी जवळपास शंभर नावांची शिफारस उच्च न्यायालयांमधील न्यायमूर्तींच्या नियुक्त्यांसाठी केलेली आहे.

हेही वाचलं का? 

 

Back to top button