Sushant Singh Rajput: सुशांतचा पाळीव कुत्रा 'Fudge' चा मृत्यू, बहिणीची भावूक पोस्ट | पुढारी

Sushant Singh Rajput: सुशांतचा पाळीव कुत्रा 'Fudge' चा मृत्यू, बहिणीची भावूक पोस्ट

पुढारी ऑनलाईन डेस्क : चित्रपट अभिनेता सुशांत सिंहच्या मृत्यूच्या ३ वर्षांनंतर त्याचा पाळीव कुत्रा ‘Fudge’ चा मृत्यू झाला आहे. (Sushant Singh Rajput) सुशांतची बहिण प्रियंका सिंहने ट्विटरवर या गोष्टीची माहिती दिलीय. तिने एक भावूक पोस्टदेखील लिहिलीय. (Sushant Singh Rajput)

बहिणीने शेअर केली भावूक पोस्ट

प्रियंका सिंहने सुशांतचा पाळीव कुत्र्याचा फोटो शेअर करत या मृत्यूची माहिती दिलीय. जो फोटो प्रियंकाने शेअर केला आहे, त्यामध्ये सुशांत सिंह राजपूत आणि ‘Fudge’ दोघे दिसत आहेत. फोटो शेअर करत प्रियांकाने लिहिलं, किती काळ लोटला फज. तू आता तुझ्या मित्राकडे पोहोचलास, स्वर्गात. मन तुटलं.

प्रियंकाच्या या ट्विटवर सुशांत सिंहच्या तमाम फॅन्सनी आपली प्रतिक्रिया देत भावना व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिलंय, माफ करा दीदी, तुम्हाला खूप सारं प्रेम, हे मन हेलावणारे वृत्त आहे.

लोक देत आहेत श्रद्धांजली

सोशल मीडियावर दुसऱ्या युजरने लिहिलं, ते स्वर्गामध्ये पुन्हा भेटले. मला माहिती आहे की, आपल्या मालकाच्या मृत्यूनंतर पाळीव प्राणी अधिक काळ जिवंत राहत नाहीत. आणखी एका युजरने लिहिलं, दीदी तुम्हाला सांगू शकत नाही की, माझं मन किती दुखावलं गेलं आहे. या वृत्ताने पुन्हा एकदा लाखों हृदय तुटले आहेत. सुशांतशी संबंधित प्रत्येक गोष्ट माझ्या मनाजवळ आहे. मी केवळ हेच सांगू शकेन की, तुम्ही मजबूत राहा. काही सांगण्याच्या मनस्थितीत नाही. तुला खूप आठवण करेन फज.

Back to top button