पुढारी ऑनलाइन डेस्क : बिग बॉसला पहिला फायनलिस्ट मिळाला आहे. टीव्हीची प्रसिद्ध सून निमृत कौर अहलूवालिया बिग बॉस १६ ची पहिली फायनलिस्ट झाली आहे. शिव ठाकरेनंतर निमृत कौर (Nimrit Kaur Ahluwalia) कॅप्टन बनलीय. लेटेस्ट प्रोमोमध्ये तुम्ही पाहू शकता की, कशाप्रकारे बिग बॉस एक टास्क देतात. जर कोणी कंटेस्टेंट निमृतची कॅप्टन्सी घेतली तर तो फिनालेमध्ये पोहोचेल. नाही तर निमृत सर्वांना मात देऊन पहिली फायनलिस्ट बनेल. (Nimrit Kaur Ahluwalia)
सोशल मीडियावर बिग बॉस १६ मध्ये प्रत्येक क्षण ट्रेंड होऊ लागला आहे. 'टिकट टू फिनाले' टास्कमध्ये निमृत कौरचं विजयी होणं प्रेक्षकांना आवडलं नाही. लोक बिग बॉसला बायस्ड म्हणत आहेत आणि विचारत आहेत की, निमृतवर इतकी दया का येत आहे? प्रेक्षकांचा आरोप आहे की, बिग बॉसचे निर्माते मुद्दामहून अशा प्रकारचे टास्क देत आहेत. कारण, त्यांना माहिती आहे की, निमृतला कॅप्टन बनवण्यासाठी सदस्य काहीही करू शकतात.
सोशल मीडियावर प्रियंका चाहर चौधरीच्या पंचलाईनसोबत छोटी सरदारनीला ट्रोल केलं जात आहे. 'निमृत एकटी कधीच खेळली नाही.' याशिवाय एका युजरने लिहिलं- त्यांना स्वत: खेळू द्या, तेव्हा सत्य समोर येईल.'
निमृत बिग बॉसच्या घरात एंट्री करणारी पहिली कंटेस्टेंट आहे. तिला कॅप्टन बनवलं होतं. पहिल्याआठवड्यात लोकांनी तिच्या गेमचे कौतुकदेखील केले. यानंतर निमृत दिसली नाही. तिने साजिद खानचा ग्रुप जॉईन केला आणि ती शिवची चांगली मैत्रीणदेखील बनली.