Ved movie Collection : दुसऱ्या आठवड्यातही ‘वेड’ची दमदार कमाई; रितेश देशमुख म्हणाला… | पुढारी

Ved movie Collection : दुसऱ्या आठवड्यातही ‘वेड’ची दमदार कमाई; रितेश देशमुख म्हणाला…

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुखच्या ‘वेड’ चित्रपटाने खरोखर चाहत्यांना वेड लावले आहे. हा चित्रपट रिलीज होवून सध्या दोन आडवडे झाले तरी चाहत्यांची सिनेमा थिअटरमध्ये गर्दी पाहायला मिळत आहे. या चित्रपटाने पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात ४०. ८५ कोटींचा ( ved movie Collection ) टप्पा पार करत दमदार कमाई केली आहे. अशीच परिस्थिती कायम राहिल्यास लवकरच हा चित्रपट नागराज मंजुळे याच्या ‘सैराट’ चित्रपटाला मागे टाकण्याची शक्यता आहे. याच दरम्यान रितेशला एका चाहत्यांने अनोखा सल्ला दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रितेशच्या वेड चित्रपटाने दहाव्या दिवशी ( रविवारी) तब्बल ५.७० कोटींची तर तेराव्या दिवशी ३८. ९७ कोटींची कमाई केली. चौदाव्या दिवशी गुरुवारी (१२ जानेवारी) १.२० कोटींची कमाई केली. तर या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात २०.६७ कोटींचा आणि दुसऱ्या आठवड्यात २०.१८ कोटींची कमाई केली. यावरून दोनच आठवड्यात वेडने दमदार कमाई करत एकूण ४०. ८५ कोटींचा टप्पा पार केला आहे. रितेशच्या वेड चित्रपटाने लयभारी आणि या चित्रपटांना मागे टाकले आहे. ‘वेड’ हा चित्रपट ३० डिसेंबर २०२२ रोजी रिलीज झाला होता. कमाईच्या आकड्यावरून रितेशचा हा चित्रपट ‘सैराट’ चित्रपटाला मागे टाकणार का?याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

याच दरम्यान रितेशने वेडच्या चित्रपटातील एक पोस्टर शेअर करत दोन आठवड्यातील कमाईचे आकडे शेअर केले आहेत. यानंतर त्याच्यावर चाहत्यांकडून भरभरून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. यावेळी एका चाहत्यांने रितेशला खास सल्ला देताना ‘हिंदीत सहाय्यक भूमिका करण्यापेक्षा मराठीत चित्रपट काढा. कारण मराठी चित्रपट ब्लॉक ब्लॉकबस्टर ठरतो’. असे म्हटलं आहे. ( ved movie Collection )

हेही वाचा : 

Back to top button