Sharvari Wagh : शर्वरी भगवी बिकिनी घालून कॅमेऱ्यासमोर: युजर्स म्हणाले,उर्फीची कॉपी | पुढारी

Sharvari Wagh : शर्वरी भगवी बिकिनी घालून कॅमेऱ्यासमोर: युजर्स म्हणाले,उर्फीची कॉपी

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘बंटी आणि बबली २’ फेम आणि बॉलिवूड अभिनेत्री शर्वरी वाघ ( Sharvari Wagh ) विक्की कौशलचा लहान भाऊ सनी कौशलला डेट करत असल्याची चर्चा रंगली आहे. ‘बंटी आणि बबली २’ या चित्रपटातून तिने पहिल्यांदा बाॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. याच दरम्यान शर्वरी मुंबईतील एका कार्यक्रमाला पोहोचली असून यावेळीच्या तिच्या भगव्या बिकिनीची चर्चा रंगू लागलीय.

अभिनेत्री शर्वरी वाघ हीने (Sharvari Wagh) नुकतीच मुंबईतील एका कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमात तिने भगव्या रंगाच्या बिकिनीवर त्याच रंगाचे ओव्हरसाईज ब्लेझर परिधान केले आहे. याशिवाय तिने कटआऊट नेट स्कर्ट परिधान करून चारचॉंद लावले आहेत. मात्र, या कार्यक्रमात शर्वरी कॅमेऱ्यासमोर येताच चाहत्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या. यात शर्वरी अभिनेत्री उर्फी जावेदची कॉपी असल्याचं म्हटलं जात आहे.

शर्वरीचा हा व्हिडिओ विरल भयानी इन्स्टाग्रामवर शेअर झाला आहे. यात पहिल्यांदा शर्वरीनं यलो आणि व्हाईट कलरचा प्रिन्टेजड गाऊन परिधान केला आहे. तर दुसऱ्या लूकमध्ये ती भगव्या रंगाच्या बिकिनीत दिसली. यानंतर चाहत्यांनी तिच्यावर भरभरून कॉमेन्टस केल्या आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये ‘बॉलिवूड स्टार शर्वरी मुंबईतील एका कार्यक्रमामध्ये शोस्टॉपर म्हणून अतिशय सुंदर आणि ग्लॅमरस’ असे लिहिले आहे.

यात ‘आता भगव्या रंगाचा अपमान होत नाही का?’, ‘पुन्हा एकादा भगव्या रंगाचा अपमान केला जातोय हे पाहवत नाही’, ‘शर्वरी चक्क अभिनेत्री उर्फी जावेदच्या स्टाईलची कॉपी करत आहे’, ‘आता उर्फी जी फॅशन करणार तीच इतर अभिनेत्री फॉलो करणार आहेत’. यासारख्या अनेक मिश्किल कॉमेन्टस करत चाहत्यांनी प्रश्न विचारले आहेत. याशिवाय काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरचे ईमोजी शेअर केले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून शाहरूख खान आणि दीपिका पादुकोण याच्या आगामी ‘पठाण’ गाण्यातील भगव्या बिकिनीवर अनेकांनी आक्षेप घेतला होता. यानंतर शर्वरीलादेखील भगव्या बिकिनीत पाहून यांची चर्चा जोर धरू लागली. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास शर्वरी आमिर खानचा मुलगा जुनैद खानसोबत आगामी ‘महाराजा’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ मल्होत्रा हे करत आहेत.

हेही वाचा?

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

Back to top button