Pallavi Joshi : अभिनेत्री पल्लवी जोशीला गाडीने मारली धडक, किरकोळ दुखापत | पुढारी

Pallavi Joshi : अभिनेत्री पल्लवी जोशीला गाडीने मारली धडक, किरकोळ दुखापत

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीची पत्नी आणि अभिनेत्री पल्लवी जोशी (Pallavi Joshi)चा अपघात झाला आहे. अभिनेत्री पल्लवी जोशी हैदराबादमध्ये आगामी चित्रपट ‘द वॅक्सीन वॉर’ (The Vaccine War) चे शूटिंग करत होती. तेव्हा तिला एका गाडीने धडक दिली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एका गाडीच्या चालकाचे नियंत्रण सुटले आणि त्या गाडीने पल्लवी जोशीला धडक दिली. पल्लवीला किरकोळ दुखापत झाली. तिने धडक दिल्यानंतर देखील शूटिंगसाठी पहिला शॉट दिला. त्यानंतर तिला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. (Pallavi Joshi)

‘द वॅक्सीन वॉर’ चित्रपटाची कहाणी सत्य घटनेवर आधारित आहे. कोविड दरम्यान वॅक्सीन्सवरून लोकांना ज्या आव्हानांना सामोरं जावं लागलं, त्यावर ही कथा आधारित आहे. चित्रपटामध्ये अनुपम खेर आणि नाना पाटेकर मुख्य भूमिकेत आहेत.

Back to top button