Pooja Hegde : पूजा हेगडेचं सौंदर्य साडीत खुलंलं | पुढारी

Pooja Hegde : पूजा हेगडेचं सौंदर्य साडीत खुलंलं

मुंबई; पुढारी ऑनलाईन : बॉलिवूड अभिनेत्री पूजा हेगडे (Pooja Hegde) ही नेहमी आपले हटके फोटो शेअर करून सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. बॉलिवूड अभिनेता प्रभाससोबत ती आगामी ‘राधे श्याम’ या रोमँटिक चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. पूजा हेगडे (Pooja Hegde) ने सध्या गोल्डन रंगाच्या साडीत फोटोशूट केलं आहे.

नुकतेच पुजाने आपल्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवर काही साडीतील फोटो शेअर केले आहेत.

या फोटोत पुजाने गोल्डन रंगाच्या साडीसोबत सिल्वर रंगाचे ब्लाउज परिधान केले आहे.

यासोबतच तिने आपल्या कानात मोठ्या इअररिंगस घालून आपल्या सौंदर्यात भर घातली आहे.

पूजाच्या या फोटोशूटने चाहत्याचे लक्ष केंद्रित केले आहे.

हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच धुमाकूळ घालत आहेत. यात चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

एका युजर्सने ‘तुम्हच्यावर हा ऑरेंज रंग रूप चांगला दिसतो’. तर दुसऱ्या एकाने ‘तुझा हा लूक आवडला असून, यात तू खूपच ग्लॅमरस दिसत आहेत’ अशा हटके कॉमेंन्टस केल्या आहेत.

या कॉमेंन्टससोबत चाहत्यांनी प्रेमाचा आणि फायरचा ईमोजी शेअर केला आहे. या हटके फोटोशूटने चाहत्यांचं मन पूजाने जिंकले आहे.

मुंबईत जन्मलेल्या पूजाला महाविद्यालयीन जीवनापासूनच अभिनय आणि मॉडेलिंगची आवड होती.

तिने २०१२ मध्ये तामिळ चित्रपट ‘मुगामुडी’पासून आपल्या करिअरला सुरूवात केली.

त्यानंतर तिने अनेक दाक्षिणात्य चित्रपटात काम केले.

आशुतोष गोवारीकर यांच्या ‘मोहेंजो दारो’ (२०१६) चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

या चित्रपटात तिने बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनसोबत काम केले. यानंतर पूजा अक्षय कुमारसोबत ‘हाऊसफुल ४’मध्ये झळकली.

पूजा हेगडेचा आगामी ‘राधे श्याम’

दक्षिणात्य अभिनेता प्रभाससोबत पूजा आगामी ‘राधे श्याम’ चित्रपटात दिसणार आहे.

या चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान पूजा आणि प्रभास दोघांच्यात किरकोळ भांडण झाल्याचे वृत्त पसरले होते. परंतु, दोघांमध्ये नेमका कोणत्या कारणाने वाद झाला? याबाबत अध्याप खुलासा झालेला नाही.तर सध्या यावर चित्रपट निर्मात्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

यात निर्मात्यांनी पूजा आणि प्रभास दोघांमध्ये सर्व काही ठीक असून चित्रपटाचे शूटिंग सुरु असल्याचे सांगितले आहे.

पसरलेल्या वृत्तामध्ये कोणतेही तथ्य नसल्याचेदेखील त्यांनी यावेळी सांगितले आहे.

आगामी ‘राधे श्याम’ चित्रपटात १४ जानेवारी २०२२ रिलीज होणार आहे.

‘राधे श्याम’ हा एक बहुभाषी चित्रपट असून निर्मिती निर्माण भूषण कुमार, वामसी आणि प्रमोद यांनी केले आहे. तर गुलशन कुमार व
टी-सीरीज यांच्याद्वारे प्रस्तुत या चित्रपटाचे दिग्दर्शन राधा कृष्ण कुमार यांनी केले आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button