Ankita Lokhande : अंकिताने बाॅयफ्रेंडचा घेतला किस अन्... - पुढारी

Ankita Lokhande : अंकिताने बाॅयफ्रेंडचा घेतला किस अन्...

मुंबई, पुढारी ऑनलाईन : अभिनेता सुशांत सिंह राजपुतच्या चाहत्यांना अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) हिचं आणि विकी जैनसोबत असलेलं प्रेम जराही रुचलेलं नाही. त्यामुळे अंकिताने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एखादा फोटो शेअर केला की, सुशांतचे चाहते तिला ट्रोल केल्याशिवाय राहत नाहीत.

Ankita Lokhande

आता पुन्हा ती सुशांतच्या चाहत्यांच्या निशाण्यावरआली आहे. कारण तिने विकी जैनसोबत एक फोटो शेअर केलेला आहे. आता या फोटोमध्ये अंकिता तिच्या बाॅयफ्रेंडसोबत म्हणजेच विकी जैनसोबत थेट किस करतानाचा फोटो शेअर केला आहे. इतकंच नाही, तर तिने कॅप्शन अशी दिली आहे की, त्या फोटोसहीत कॅप्शनचाही सुशांतच्या चाहत्यांना  राग आलेला दिसत आहे. त्यामुळे तिला ट्रोल केलं जात आहे.

Ankita Lokhande

या फोटोच्या कॅप्शनमध्ये अंकिता (Ankita Lokhande) म्हणते की, “देवाने तुमच्यासाठी जी प्रेमकथा लिहिलेली असते, ती तुम्ही गंमत म्हणून घेऊन नका. देव तुमच्यासाठी असे काही करतो ते तुम्ही त्याच्याकडून मागूही शकत नाही आमि त्याची कल्पनाही तुम्ही कधी केलेली नसते”, असा मजकूर लिहीत विकी जैनबरोबर किस करतानाचा तिने फोटो शेअर केलेला आहे. आणि त्या मजकुराला ‘खरी खुरी प्रेमकथा’, असं शिर्षक दिलेलं आहे. त्यामुळे सुशांतच्या चाहत्यांनी तिला ट्रोल केलेलं आहे.

Ankita Lokhande

सुशांतचे चाहते काय म्हणतात? 

विकीचा किस करताना अंकिताने जो फोटो शेअर केला त्यावर युजर्स म्हणतात की, “जर ही तुझी खरी प्रेमकथा असेल तर सुशांत सिंह राजपुतसोबत असलेली प्रेमकथा खोटी होती का?” आणखी एक युजर म्हणतो की, “खरीखुरी प्रेमकथा तुझी आणि सुशांतचीच होती.” आणखी एक युजर म्हणतो की, “मला हे दोघे अजिबात आवडत नाहीत. सुशांत हा माझा आवडता होता आणि कायमच आवडता राहील.

पहा व्हिडीओ : चला पाहूया अभिनेत्री स्मिता जयकर यांच्या घरचा बाप्पा

Back to top button