क्रांतीसिंह नाना पाटील यांची कन्या क्रांतिवीरांगणा हौसाताई पाटील यांचे निधन | पुढारी

क्रांतीसिंह नाना पाटील यांची कन्या क्रांतिवीरांगणा हौसाताई पाटील यांचे निधन

विटा ; पुढारी वृत्तसेवा : क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कन्या आणि माजी आमदार भगवान बाप्पा पाटील यांच्या पत्नी क्रांतिवीरांगणा हौसाताई पाटील यांचे वयाच्या ९६ व्या वर्षी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून क्रांतिवीरांगणा हौसाताई पाटील आजारी होत्या आज कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असतानाच निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले , एक मुलगी , सुना नातवंडे, परतवंडे असा मोठा परिवार आहे.

श्रीमती हौसाताई पाटील यांनी क्रांतिसिंहांच्या बरोबरीने भूमिगत कारवायांमध्ये मुख्य भूमिका बजावली. त्या इंग्रजांच्या माहिती गोळा करून त्या भूमिगत क्रांतिकारकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करीत होत्या.

वयाच्या २० व्या वर्षी महिलांना एकत्र करणे, चळवळी साठी प्रवृत्त करणे, या सारखी कामे त्यांनी केली.

हैदराबाद मुक्तिसंग्राम आणि गोवा मुक्तिसंग्रामामध्ये देखील क्रांतीविरांगणा पाटील यांचे योगदान आहे. तसेच संयुक्त महाराष्ट्र चळवळीत ही त्यांनी मोलाची भूमिका निभावली होती. त्यांच्या जाण्याने स्वातंत्रपूर्व काळातील महत्वाचा दुवा निखळला आहे.

दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आमच्या आज्जीच्या पार्थिवावर कराड येथेच शासकीय नियमानुसार अंत्यसंस्कार करणार आहेत अशी माहिती क्रांतिवीरांगणा श्रीमती क्रांतिवीरांगणा हौसाताई पाटील यांचे नातू इंद्रजित पाटील यांनी दिली आहे.

Back to top button