पुढारी ऑनलाईन डेस्क : 'अली बाबा: दास्तान-ए-काबुल' मालिकेतील अभिनेत्री तुनिषा शर्माने (Urfi Javed) स्वत:चे जीवन संपवले आहे. याप्रकरणी तुनिषाच्या आईने सहकलाकार शीझानवर आरोप करत त्याला कडक शिक्षा व्हावी, अशी मागणी केली आहे. आता अभिनेत्री उर्फी जावेद हिची प्रतिक्रिया समोर आली आहे. (Urfi Javed)
अतरंगी फॅशन करणाऱ्या उर्फी जावेदने शीझान खानला पाठिंबा दिलाय. तिने सोशल मीडियावर एक मेसेज शेअर केलाय. उर्फीने या मेसेजमध्ये तरुणींना हेदेखील सांगितलं आहे की, तरुणींनी कुणासाठी आपला जीव देऊ नये.
बुधवारा रात्री आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर, उर्फीने लिहिलं, 'तुनिषा प्रकरणात मला दोन टक्के वाटलं की, तो चुकीचा असू शकतो. त्याने तिच्यासोबत धोका केला आहे. परंतु, आम्ही त्याला तिच्या मृत्यूसाठी दोषी धरता येणार नाही. मुलींना कुणासाठी आपला जीव देण्याची गरज नाही. कुणीही या लायकीचा कधीही नसतो. कधी-कधी ही गोष्ट जगाचा अंत झाल्याप्रमाणे वाटू शकते. पण, त्या लोकांविषयी विचार करा, जी तुमच्यावर प्रेम करतात. तुम्ही स्वत: वर अधिक प्रेम करा. हिरो स्वत: बना. कृपया थोडा वेळ द्या. जीवन संपवल्याने दु:ख कधी संपुष्टात येत नाही. जे मागे राहतात, ते अधिक पीडित राहतात.'
तुनिषाने 'अली बाबा: दास्तान-ए-काबुल' च्या सेटवर आपले जीवन संपवले होते. अभिनेत्री तुनिषाचा शीझान खानसोबत ब्रेकअप झाला होता. शीजान खान पोलिसांच्या ताब्यात असून त्याची चौकशी सुरू आहे.
हेही वाचा :