Nitin Manmohan : ‘लाडला’ चित्रपटाचे निर्माते नितिन मनमोहन यांचे निधन | पुढारी

Nitin Manmohan : ‘लाडला’ चित्रपटाचे निर्माते नितिन मनमोहन यांचे निधन

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूड चित्रपट इंडस्ट्रीतील प्रसिद्ध निर्माते नितिन मनमोहन यांचं आज २९ डिसेंबर रोजी निधन झाले. नितिन मनमोहन (Nitin Manmohan) यांना हार्ट ॲटॅक आल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती गंभीर होती आणि त्यांना वेंटिलेटरवर देखील ठेवण्यात आले होते. (Nitin Manmohan)

निर्माते मनमोहन यांना ३ डिसेंबर रोजी सायंकाळी हार्टअॅटक आला होता. त्यानंतर तत्काळ कोकिला धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती त्यावेळी गंभीर होती. त्यांना अखेर वेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं.

नितिन मनमोहन यांनी आपल्या करिअरमध्ये अनेक उत्तम चित्रपटांची निर्मिती केली होती. ‘बोल राधा बोल’, ‘लाडला’,’दस’ यासारख्या सुपरहिट चित्रपटांचे निर्माते मनमोहन यांनी सलमान खानच्या ‘रेडी’ चित्रपटाचीही निर्मिती केली होती. बॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेते मनमोहन यांचे ते पुत्र होत. मनमोहन यांनी ‘ब्रह्मचारी’, ‘गुमनाम’ आणि ‘नया जमाना’ सारखे चित्रपट आणले. वडिलांप्रमाणे नितीनदेखील करिअर करण्यासाठी चित्रपट इंडस्ट्रीत उतरले होते.

अधिक वाचा-

Back to top button