पुढारी ऑनलाईन डेस्क : पठाण (Pathan Movie) चित्रपटातील वादग्रस्त भाग बदलण्याचा सल्ला सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनी दिला आहे. चित्रपटाच्या गाण्यात बदल करण्यात यावा तसेच विवादित भाग वगळून चित्रपट रिलीज करण्याचा सल्ला 'सेन्सॉर'ने दिलाय. (Pathan Movie)
बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण यांचा 'पठाण' चित्रपट रिलीज होण्याआधी वादात अडकलाय. या चित्रपटातील 'बेशर्म रंग' गाण्यावरुन मोठा वाद झालाय. दीपिका पादुकोणचा बोल्ड डान्स आणि भगव्या रंगाच्या बिकिनीवरून सोशल मीडियावर खूप वाद होताना दिसले. यानंतर आता सेन्सॉर बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेटकडून 'पठाण'मधील गाणे, बिकिनी आणि अनेक अन्य गोष्टी कट करण्याचा सल्ला दिला. सेन्सॉर बोर्डाने निर्मात्यांना सांगितले की, सर्व वादग्रस्त सीनवर काम करून रिलीजपूर्वी संपादित व्हर्जन जमा करावा. आता 'पठाण'चे निर्माते हा वादग्रस्त भाग काढून टाकणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी म्हणाले की, "पठाण चित्रपट 'सीबीएफसी'मध्ये एक्झामिनेशन कमिटीकडे मंजुरीसाठी आला आहे. या चित्रपटाला सर्टिफिकेट देण्याची प्रक्रिया सुरु आहे. बोर्डाकडून या गाण्यामध्ये बदल करण्यासहित काही सूचनादेखील दिल्या आहेत.
प्रसून जोशी म्हणाले की, 'सीबीएफसी' नेहमी रचनात्कमता आणि संवेदनशीलतेने संतुलन ठेवून काम करते. प्रेक्षकांचेदेखील बोर्डाकडून हाच विश्वास जोडला गेलाय. आता हा प्रश्न आहे की, ज्या गाण्यावरून वाद झाला होता, त्यामध्ये निर्माते काय बदल करतील? 'बेशर्म रंग' या गाण्यावरून दीपिकाच्या बिकिनीवर निर्माते काय बदल करतील, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
पठाण २५ जानेवारी रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. आतापर्यंत निर्मात्यांनी केवळ एक टीझर आणि दोन गाणी रिलीज केली आहेत. रिलीजची डेट जवळ आलीय. रिपोर्टनुसार, निर्मात्यांकडून 'बेशर्म रंग'चे गाणे एडिट करण्याचे काम सुरु आहे. याचसोबत काही रिपोर्ट्सचं म्हणणं आहे की, 'पठाण'चा ट्रेलर न्यू ईअरला रिलीज होऊ शकतो.
हेही वाचा :