Sai Lokur : सई पतीसोबत राजस्थानमध्ये; मित्रांसोबत केला कल्ला (video) | पुढारी

Sai Lokur : सई पतीसोबत राजस्थानमध्ये; मित्रांसोबत केला कल्ला (video)

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री सई लोकूरने ( Sai Lokur ) निर्माता तिर्थदीप रॉयशी बंगाली पद्धतीने शाही अंदाजात लग्न बंधनात अडकली. या विवाहानंतर सईने हनीमून ट्रीप असो वा मालदीव बीच, बाली, दुबईची सफर, बुर्ज खलिफा, अबूधाबी, अमेरिका असा अनेक ठिकाणच्या सफरीत पतीसोबत अंनद घेताना दिसली. याशिवाय मध्यतंरी सईची मंगळागौरी सणदेखील तिच्या घरात मोठ्या उत्साहात पार पाडला होता. सईने प्रत्येक लोकेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेले आहेत. सध्या सई पती आणि कुटुंबियांसोबत राजस्थानला पोहोचली आहे. यावेळी तिच्या एकापेक्षा एक हॉट फोटो आणि लोकेशनने चाहत्याचे लक्ष वेधून घेतले आहे.

अभिनेत्री सई लोकूरने ( Sai Lokur ) तिच्या इंन्स्टाग्रामवर राजस्थानमधील अनेक मंदिर आणि किल्याचे फोटो शेअर केले आहेत. यात बडा बाग मंदिर (जेसलमेर, Bada Bagh Temple), जेसलमेर किल्ला, गोल्डन सिटी या भव्यदिव्य ठिकाणी तिने भेटी दिल्या आहेत. यावेळी सईच्या ग्लॅमरस लूकसोबत तेथील सुंदर संगमरवरी नक्षीकाम केलेले खांब आकर्षणाचा केंद्रबिदू ठरले. यावेळी सईने ब्ल्यू कलरचा वनपीस तर पती तिर्थदीपने ब्लॅक कलरचा टी शर्ट आणि जीन्स परिधान केला आहे.

या फोटोला सईने ‘Padharo Mhare Des!’, ‘Padharo Mhare Des! Our mad group got a new name in Rajasthan and it was “Turban group” 🤣🤣’, ‘Golden and Gleaming!At Bada Bagh, Jaisalmer’. अशा वेगवेगळ्या कॅप्शन लिहिल्या आहेत. शेअर केलेल्या फोटोत सई पती तिर्थदीप, कुटुंबिय आणि मोजक्याच मित्रासोबत दिसली आहे. हे फोटो चाहत्याच्या पसंतीस उतरले आहेत.

सईचे हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी भरभरून कॉमेन्टस केल्या आहेत. यात ‘Beautiful ❤❤🌹🌹’, ‘Awesome❤❤❤ 🌹🌹🌹’, ‘Stunning Shot ..👏👏’, ‘So Gorgeous Sai…, Jabardast….❤️’, ‘These kind of pictures i wanted to see since long time… Rajasthan is love❤️❤️❤️ And You are there. Our Love is in the City of Love 🔥’, ‘❤️ खूप सुंदर ❤️’, ‘Very Nice’, ‘Beutiful pic this’, ‘Khup cham ❤️’, यासारख्या कॉमेन्टस केल्या आहेत. या फोटोला आतापर्यंत जळपास ५ हजारांहून अधिक जणांनी लाईक्स केले आहे. याशिवाय सई नेहमी सोशल मीडियावर फोटो शेअर करून चाहत्याच्या संपर्कात राहत असते.

हेही वाचलंत का? 

 

View this post on Instagram

 

A post shared by Sai Lokur (@sai.lokur)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sai Lokur (@sai.lokur)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sai Lokur (@sai.lokur)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sai Lokur (@sai.lokur)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sai Lokur (@sai.lokur)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sai Lokur (@sai.lokur)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sai Lokur (@sai.lokur)

Back to top button