पुढारी ऑनलाईन डेस्क : 'सविता भाभी' आणि 'जी लेने दो एक पल' यासारख्या चित्रपटात भूमिका साकारणारी अभिनेत्री आणि मॉडेल रोजलिन खान ( Rozlyn Khan ) ओलिगोमेटास्टेटिक कॅन्सर आजारांशी (oligometastatic cancer) लढा देत आहे. रोजलिन सध्या कॅन्सरच्या चौथ्या स्टेजवर असल्याने तिच्यावर उपचार सुरू आहेत. या गंभीर आजाराने तिच्या डोक्यावरील केस पूर्ण गळाले आहेत. एकिकडे ही अभिनेत्री कॅन्सरशी लढा देत आहे. तर दुसरीकडे नेटकऱ्यांनी तिला चांगलेच धारेवर धरले आहे.
रोजलिन खान हिने नुकतेच काही दिवसांपूर्वी स्वत:ला कॅन्सरचे निदान झाल्याची माहिती सोशल मीडियावर पोस्ट करून दिली होती. यानंतर नेटकऱ्यांनी तिला टोमणे मारत तिच्या कर्माची फळे भोगत असल्याचे म्हटलं आहे. ही माहिती रोजलिनने नुकतेच झालेल्या एका मुलाखतीत दिली आहे.
यात तिने म्हटले आहे की, मी स्वत: कॅन्सरचे निदान झाल्याची माहिती चाहत्यांत शेअर करण्यासाठी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली होती. आपल्या देशात कॅन्सरला भंयकर मानले जात असून लोकांची मानसिकता बदलण्याची गरज आहे. कॅन्सरला लोक कलंक मानतात. आपण कोविडबद्दल सजगतेने बोलतो, परंतु कॅन्सरबद्दल फारसे बोलले जात नाही. महिलांच्या सौदर्यात तिच्या केसांना खूपच महत्व दिले जाते. तिसऱ्या किमोथेरेपीमध्ये जेव्हा माझ्या डोक्यावरील संपूर्ण केस गेले. त्यानंतर लोंकाची मानसिकता पूर्णच बदलली आणि मला टोमणे मारण्यास सुरूवात केली. 'कॅन्सर झाला हे तुझ्या कर्माची फळे आहेत', 'ये तुझ्या मागिल जन्माचे पाप आहे'. असे नेटकऱ्यांनी म्हटले आहे.
या फोटोच्या कॅप्शन तिने 'Cancer. Mushkil logon ki zindagi Aasaan nahi hoti ye kahin pada tha. but now I know it's for people like me??? god gives toughest battles to his strongest soldiers. This can be one chapter of my life, keeping faith n hope. Every setback makes me strong. this shall too. I have lovely people praying for me. jo hota hai achchey ke liye hota hai aur wo achcha mein hoon☝️. There were no signs except severe pain in neck n back and I mistook it for gymnastics pain n stress on my back. anyways early detected Dear brands i will be available for you to shoot with me on 2nd week of every month as I will have to go under chemotherapy for coming 7 months and need rest of one week after each chemotherapy. you need courage to work with bald model,But now I Will live one day at a time'. असे तिने लिहिले होते. रोजलिन खान सध्या ओलिगोमेटास्टेटिक कॅन्सरच्या चौथ्या स्टेजवर आहे. पहिल्यांदा कॅन्सरचे निदान झाल्यावर पूर्णपणे मनाने खचली होती.
हेही वाचलंत का?