भंडारा : ट्रकच्या धडकेत प्राध्यापिका ठार | पुढारी

भंडारा : ट्रकच्या धडकेत प्राध्यापिका ठार

भंडारा, पुढारी वृत्तसेवा : चुलतभावासोबत दुचाकीने शाळेत जात असताना भरधाव ट्रकने धडक दिल्याने प्राध्यापिका ठार झाल्याची घटना साकोली येथील कपुरी नाल्याजवळ घडली. रिना प्रभाकर मस्के ( वय ३६, रा. पंचशिल वॉर्ड, साकोली) असे त्‍यांचे नाव आहे. त्या कोकणा येथील अवधूत आश्रम कनिष्ठ महाविद्यालयात विज्ञान विषयाच्या प्राध्यापिका म्हणून कार्यरत होत्या.

रिना  मस्के आज (दि.२९) सकाळी चुलतभावासोबत दुचाकीने (एमएच ३५ एपी १४२८) साकोली येथून कोकणाकडे जात होत्या. राष्ट्रीय महामार्गावर सेंदूरवाफा टोलनाक्याजवळ कपुरी नाल्यासमोर भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यात रिना यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तत्काळ उपचारासाठी साकोली येथे दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी उपचारासाठी नागपूरला हलवण्याचा सल्ला दिला. मात्र, पुढील उपचारासाठी नागपूर येथे नेत असताना त्यांचा जांभळी सडक येथे वाटेतच मृत्यू झाला.

हेही वाचलंत का?

Back to top button