Anil Kapoor B’day: ‘असली छोकरा हुआ जवा रे..’ म्हणत अर्जुन-सोनमकडून खास अंदाजात शुभेच्छा

anil kapoor with grandson
anil kapoor with grandson
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेते अनिल कपूर यांचा आज २४ डिसेंबर रोजी वाढदिवस. या वाढदिवसाच्या औचित्याने संपूर्ण इंडस्ट्रीतून 'झक्कास' अभिनेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. आपल्या करिअरमध्ये अनिल यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. त्यांना मोठ्या पडद्यावर पाहणे फॅन्सना आजदेखील आवडते. ते केवळ अभिनयातचं नाही तर फिट पर्सनॅलिटीसाठीही ओळखले जातात. आता वाढदिवसाच्या औचित्याने सोनम कपूर आणि अर्जुन कपूर यांनी खास अंदाजात त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. अर्जुनने एक खास व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडिओसोबत मजेशीर कॅप्शनदेखील आहे.

अनिल कपूरचा वर्कआऊट व्हिडिओ पोस्ट करून केलं विश

अर्जुन कपूरने अनिल यांना शुभेच्छा देत आपल्या इन्स्टाग्रामवर अनिल यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अनिल वर्कआऊट करताना दिसले होते. कधी ते समुद्र किनारी पळताना तर कधी वेगवेगळ्या अंदाजात दिसले. व्हिडिओमध्ये सुरूवातीला लिहिलेलं दिसतं की, 'असली छोकरा हुआ जवा रे..'

या व्हिडिओमध्ये अर्जुनने कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'अँटी-एजिंगचे बादशाह अनिल कपूर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा! काका तुम्ही सुपर-सुपर आहात! मी तुमच्यावर खूप खूप प्रेम करतो.'

सोनमने आपले जुने फोटो शेअर केले आहेत. काही फोटोंमध्ये ती बहिण आणि वडील अनिल यांच्यासोबत दिसते. विशेष म्हणजे, अनिल यांनी सोनमचा मुलगा वायूला हातात धरलेला फोटो पोस्ट केला आहे. तिने आपल्या वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor)

रिलीज झालं अर्जुनच्या चित्रपटातील पहिलं गाणं

अभिनेते अर्जुन कपूर सध्या आपला आगामी चित्रपट 'कुत्ते' वरून चर्चेत आला आहे. अर्जुन स्टारर चित्रपट 'कुत्ते'मधील पहिलं गाणं 'आवारा डॉग्स' रिलीज झालं आहे. आकाश भारद्वाजद्वारा दिग्दर्शित चित्रपट 'कुत्ते'मध्ये अर्जुन शिवाय नसीरुद्दीन शाह, तब्बू, कोंकणा सेन शर्मा, राधिका मॅडम यासारखे स्टार्स मुख्य भूमिकेत आहेत. 'कुत्ते' १३ जानेवारी, २०२३ रोजी चित्रपटगृहात रिलीज होणार आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news