Suniel Shetty : सुनील शेट्टी ठरला तारणहार | पुढारी

Suniel Shetty : सुनील शेट्टी ठरला तारणहार

अभिनेता सुनील शेट्टी हा अभिनयाखेरीज समाजसेवेचे कामही करतो. चित्रपटांमध्ये हिरो असलेला अभिनेता खऱ्या आयुष्यातही हिरो आहे. त्याचं कौतुक करण्यामागचं कारण एक घटना आहे. ज्यामध्ये सुनीलने स्वतःचा जीव धोक्यात घालून अनेक मुलींचा जीव वाचवला होता. हल्ली कोणतंही चांगलं काम केलं ते सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवून वाहवाही लुटण्याचा प्रयत्न केला जातो. पण सुनील शेट्टीने केलेल्या या कार्याबद्दल अनेक वर्षे कुणालाच माहीत नव्हतं. ही घटना १९९६ साली घडली होती. सुनीलने तब्बल १२८ मुलींना मानवी तस्करीपासून वाचवलं होतं. ५ फेब्रुवारी १९९६ रोजी पोलीस आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मुंबईच्या कामाठीपुरा भागात छापेमारी केली होती. त्याठिकाणाहून त्यांनी तब्बल ४५६ मुलींची सुटका केली होती. त्या सर्व मुली १४ ते ३० या वयोगटातील होत्या. यापैकी १२८ मुली या नेपाळच्या होत्या. त्यापैकी निम्म्या मुली या अल्पवयीन होत्या. (Suniel Shetty)

Back to top button