‘मिशन इम्पॉसिबल’चे बजेट तब्बल २,४०० कोटी | पुढारी

'मिशन इम्पॉसिबल'चे बजेट तब्बल २,४०० कोटी

पुढारी ऑनलाईन डेस्क : जगप्रसिद्ध अभिनेता टॉम क्रूझ सध्या ‘मिशन इम्पॉसिबल’ मालिकेतील शेवटच्या दोन चित्रपटांचे चित्रीकरण करण्यात व्यस्त आहे. या मालिकेचा सातवा भाग पुढील वर्षी चित्रपटगृहात दाखल होईल. त्यानंतर आठवा चित्रपट २०२४ मध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘मिशन इम्पॉसिबल’च्या सातव्या भागाचे बजेट आहे २,४०० कोटी रुपये. हा जगातील सहाव्या क्रमांकाचा महागडा चित्रपट ठरणार आहे. पहिल्या क्रमांकावर ‘पायरेटस् ऑफ द कॅरेबियन ४’ आहे. तो ३१०० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झाला आहे.

निर्मात्यांनी ‘मिशन इम्पॉसिबल : डेड रेकनिंग पार्ट १’चा ट्रेलर रीलिज केला असून यात टॉम पुन्हा एकदा आयएमएफ एजंट इथन हंटच्या भूमिकेत दिसेल. त्याच्याखेरीज या चित्रपटात विंग रेम्स, सायमन पेग, रेबेका फर्ग्युसन, हेन्री चार्नी, व्हेनेसा किर्बी आणि फ्रेडरिक श्मिट हे तारे-तारका झळकणार आहेत. विशेष म्हणजे, ‘मिशन इम्पॉसिबल’ मालिकेने जगभरातील तिकीटबारीवर २९,६०० कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.

Back to top button