पुढारी ऑनलाईन डेस्क : शाहरुख खानच्या 'पठाण' चित्रपटाला ग्रहण लागल्याचे दिसत आहे. या चित्रपटातील 'बेशरम रंग' या पहिल्या गाण्यावरून प्रचंड वाद उफाळला. त्यावरील धूळ खाली बसलेली नसतानाच या चित्रपटातील दुसरे गाणे आले आणि आता या गाण्यावरही आता चोरीचा आरोप करण्यात आला आहे. या गाण्याचे नाव आहे 'झुमे जो पठाण'. या गाण्यात दीपिका पदुकोण आणि शाहरूख यांची अतिशय बोल्ड स्टाईल दिसून आली. 'अर्जुन: द वॉरिअर्स प्रिन्स' या चित्रपटातील 'कर्मा की तलवार' या गाण्याची धून तंतोतंत 'झुमे जो पठाण गाण्याशी मिळतीजुळती आहे. त्यामुळे 'झूमे जो पठाण' हे गाणेदेखील चोरीचे असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.
'कर्मा की तलवार' हे गाणे सुखविंदर सिंग यांनी १० वर्षांपूर्वी गायिले होते. संगीतकार विशाल आणि शेखर यांच्यावर 'कर्मा की तलवार' या गाण्याची धून चोरल्याचा आरोप होऊ लागला आहे. वादविवादांची ही मालिका केव्हा संपणार, हे सांगणे अशक्यच!