‘मिडनाइट दिल्ली’ : झॉलिवूडचा दिग्दर्शक तृषांत इंगळे याची अभिनयात एंट्री | पुढारी

'मिडनाइट दिल्ली' : झॉलिवूडचा दिग्दर्शक तृषांत इंगळे याची अभिनयात एंट्री

मुंबई; पुढारी ऑनलाईन : तृषांत इंगळे याने झॉलिवूड या मराठी चित्रपटातून दिग्दर्शकीय वाटचाल सुरू केली होती. आता तृषांत इंगळे अभिनयात पदार्पण करत आहे.’मिडनाइट दिल्ली’  या हिंदी चित्रपटात त्याची प्रमुख भूमिका आहे. ‘मिडनाइट दिल्ली’ या चित्रपटाची इंडिया इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल बोस्टन, शिकागो साऊथ एशिया फिल्म फेस्टिव्हलमध्ये निवड झाली. २७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत हा फेस्टिव्हल रंगणार आहे.

तृषांतनं झॉलिवूड या चित्रपटाद्वारे लक्ष वेधून घेतलं होतं. झाडीपट्टी रंगभूमीवर हा चित्रपट बेतलेला होता. न्यूटन, सुलेमानी किडा असे उत्तम चित्रपट अमित मसूरकर यांनी केले. झॉलिवूड चित्रपटाचा क्रिएटिव्ह प्रोड्यूसर, प्रस्तुतकर्ता आहे. वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये झॉलिवूडची निवड झाली होती.

“मिडनाइट दिल्ली” या चित्रपटाद्वारे अभिनयात इंगळे पदार्पण करत आहे. तृषांत सांगतो, की आयुष्य हे अनिश्चित आहे आणि पुढच्या क्षणी आपल्याबरोबर किंवा आपल्या प्रिजयनांबरोबर काय घडेल हे सांगता येत नाही. अशीच एक गोष्ट “मिडनाइट दिल्ली” या चित्रपटात मांडण्यात आली आहे.

राकेश रावतनं मिडनाइट दिल्लीचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटात माझी भूमिका एका सर्वसामान्य माणसाची आहे. आर्थिक देणी असलेला हा माणूस एका अडचणीत सापडल्यावर हिंसेच्या आहारी जातो. अतिशय मजेशीर अशी भूमिका आहे. या चित्रपटाची आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड झाली याचा मला खूप आनंद आहे.

हेही वाचलं का ? 

Back to top button