करिना कपूर हिने वयाने ११ वर्षांनी मोठा असणाऱ्या सैफशी कसं केलं लग्न? | पुढारी

करिना कपूर हिने वयाने ११ वर्षांनी मोठा असणाऱ्या सैफशी कसं केलं लग्न?

पुढारी ऑनलाईन : प्रेम न कुठल्‍या शेतात उगवते न कुठल्‍या बागेत, हा तर तो खजिना आहे जो कुण्‍या व्‍यक्‍तीला आवडला तर ती व्‍यक्‍ती राजा असो वा प्रजा, तो आपल्‍या जीवापेक्षाही अधिक मिळवण्‍यासाठी तत्‍पर असतो. प्रेमाची कोणती सीमा असते ना वय. त्‍यामुळेच आपले प्रेम मिळवण्‍यासाठी इतर कुणाचाही विचार केला जात नाही. कोण काय म्‍हणेल, याची पर्वा त्‍यांना नसते. मग, ती व्‍यक्‍ती वयाने मोठी असो वा लहान. प्रेमामध्‍ये त्‍यांचे वय कधीच आड येत नाही. वय लहान असो वा मोठे; येथे त्‍याला अजिबात महत्त्‍व दिलं जात नाही. अशाचं स्टार्सपैकी एक जोडी म्हणजे सैफ अली खान-करिना कपूर हे होय.

बॉलिवूडमध्‍ये अशा अनेक अभिनेते/अभिनेत्री आहेत, ज्‍यांनी आपल्‍यापेक्षा कितीतरी वयाने मोठ्‍या किंवा लहान अभिनेते/अभिनेत्रींशी त्‍यांनी विवाह केला आहे. प्रेमात लोक वेडे होतात. लग्‍न करण्‍यासाठी येथे कोणतेही स्‍टेटस पाहिले जात नाही. पैसे, धर्म, जात-पात पाहिली जात नाही. येथे केवळ प्रेम पाहिलं जातं.

करिना कपूर हिचा आज वाढदिवस. तिने तिच्या वयापेक्षा ११ वर्षांनी मोठ्या असणाऱ्या सैफशी लग्न केलं.

सैफ अली खान आणि बेबोची जोडी मोठ्‍या पडद्‍यावर सुपरहिट राहिली.

रिअल लाईफमध्‍येही या दोघांची जोडी हिट आणि नेहमीच चर्चेत राहिली आहे.

बेबो कपूर सैफ अली खानपेक्षा ११ वर्षांनी लहान आहे.

सैफ बेबोवर इतके प्रेम करत होता की, त्‍याने आपल्‍या हातावर बेबोचे नाव गोंदवलं.

विशेष म्‍हणजे, सैफ विवाहित होता, त्‍याला दोन मुले आहेत. हे माहिती असतानाही तिने सैफशी लग्न केलं.

सैफचा विवाह अभिनेत्री अमृतासिंहशी झाला होता. त्यांच्याही वयात खूपच अंतर होते. हे अंतर तब्बल १२ वर्षांचे होते. अमृता सैफपेक्षा तब्बल १२ वर्षांनी माेठी होती. म्हणजे सैफच्या दोन बायकांमध्ये तब्बल २४ वर्षांचे अंतर आहे.

सैफ आणि अमृताला सारा अली खान आणि इब्राहीम ही दोन मुले आहेत.

अमृतापासून वेगळे झाल्‍यानंतर सैफने बेबोशी लग्न केलं.

सैफ-करीनाला एक मुलगा तैमूर आहे.

सैफ अली खान आणि बेबो बॉलिवूडमधील स्टार कपल आहेत. दोघांच्या लग्नाला आज ९ वर्षे पूर्ण झाली आहेत. सैफ अली खान आणि बेबोने १६ ऑक्टोबर, २०१२ रोजी लग्न केले होतं.

दोघांनी एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.

सैफ अली खान-बेबोची भेट २००८ मध्य़े दिग्दर्शक विजय कृष्णा आचार्य यांचा चित्रपट ‘टशन’च्या शूटिंगवेळी झाली होती.

या चित्रपटामध्ये करिना, सैफ अली खान, अक्षय कुमार, अनिल कपूर यांच्या मुख्य भूमिका होत्या.

चित्रपट टशन बॉक्स-ऑफिस म्हणावा तसा चालला नाही. परंतु, करीना-सैफच्या प्रेमाची जादू मात्र चालली.

यानंतर सैफ-बेबो एकमेकांना भेटू लागले. दोघांनी २०१२ पर्यंत एकमेकांना डेट केलं. अखेर १६ ऑक्टोबर, २०१२ रोजी दोघांनी लग्न केलं.

एका मुलाखतीत तिने तिच्या प्रेम कहाणीबद्दल सांगितलं होतं की, सैफशी लग्न करण्यासाठी त्यांनी घरातून पळून जाण्याचा विचारदेखील केला होता.

करीनाने सैफसमोर ठेवली होती ही अट 

कपूरने म्हटले होत की, सैफ अली खानशी लग्न करण्याआधी तिने त्याच्यासमोर एक अट ठेवली होती. बेबोला लग्नानंतरदेखील काम करायचं होतं.

तिने एका मुलाखतीत म्हटलं होतं की, ‘सैफला मी जीवनसाथी यासाठी निवडलं होतं की, कारण मला आत्मनिर्भर महिलेप्रमाणे राहायचं होतं. मला लग्नानंतरही काम करायचं होतं. सैफने ही गोष्ट मान्य केली होती.’

सैफ अली खान सोबत मुलगी सारा अली खान

बेबोसोबत लग्नाच्या दिवशी सैफने अमृताला लिहिलं होतं पत्र

सैफ अली खानने बॉलीवूड अभिनेत्री अमृता सिंहशी १९९१ मध्ये लग्न केलं होतं.

२००४ ला त्यांचा घटस्फोट झाला. सैफ बेबोशी ज्या दिवशी लग्न करणार होता, त्यादिवशी त्याने अमृताला एक पत्र लिहिलं होतं. हे पत्र त्याने बेबोला वाचायला दिलं होतं. यावरून सैफ आणि बेबो यांच्यात वादही झाला होता.

सैफने या पत्रात अमृता सिंहला तिच्या भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. सैफने एका शोमध्ये सांगितलं होतं की, या पत्राविषयी मुलगी सारा अली खानला जेव्हा समजलं. तेव्हा तिने आपल्या वडिलांचं समर्थन केलं होतं. आणि सारा म्हणाली होती की, मी आता बेबोच्या लग्नात खुल्या मनाने जाईन.

सैफ अलीची पहिली पत्नी अमृता सिंह

 

 

 

 

 

 

 

 

 

 

हेही वाचलं का ? 

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Saif Ali Khan (@actorsaifalikhan)

 

View this post on Instagram

 

A post shared by Saif Ali Khan (@actorsaifalikhan)

 

View this post on Instagram

 

A post shared by Saif Ali Khan (@actorsaifalikhan)

 

View this post on Instagram

 

A post shared by Saif Ali Khan (@actorsaifalikhan)

Back to top button